आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न लागण्याआधी एकाच बेडवर आले नवरदेव-नवरी; हसत-हसत केले हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरी ओसीन आणि नवरदेव गुंजन यांनी एकत्र रक्तदान केले. - Divya Marathi
नवरी ओसीन आणि नवरदेव गुंजन यांनी एकत्र रक्तदान केले.

इंदूर - उज्जैनमध्ये बुधवारी एक अनोखे लग्न झाले. येथे नवरदेवाच्या आग्रहामुळे वधुपक्ष आणि वरपक्षातील सर्वांनी रक्तदान केले. लग्नात सर्वात विशेष बाब अशी होती की, नवरदेव-नवरीने एकाच बेडवर झोपून रक्तदान केले. रक्तदानादरम्यान दोघेही निखळ हसत होते. नवरदेवाने म्हटले की, लग्नाआधी काहीतरी चांगले काम आपल्या हातून व्हावे म्हणून रक्तदानाचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला सौभाग्यवतीनेही साथ दिली. 

> बुधवारी उज्जैनच्या तपोभूमीत मुरैनाच्या गुंजन जैन आणि ललितपूरच्या ओसीन जैन यांचे लग्न झाले. येथे लग्नाचे विधी पार पाडत असताना डॉक्टरांचे एक पथक लग्नस्थळी दाखल झाले.
> एवढ्या डॉक्टरांना अचानक आलेले पाहून सर्व पाहुणे मंडळी चकित झाली. नवरीने मग सर्वांना डॉक्टरांच्या आगमनाचे कारण सांगितले. आणि मग सुरू झाले रक्तदान. यानंतर नवरदेव-नवरी यांच्यासह एकेक करून वरपक्ष तसेच वधुपक्षातील तब्बल 60 जणांनी रक्तदान केले.
> नवरदेव गुंजन जैन म्हणाला, मी उद्योग विभागा सहायक संचालक आहे. आतापर्यंत 34 वेळा रक्तदान केलेले आहे. माझे लग्न जेव्हा ओसीनशी जमले तेव्हाच मी माझा रक्तदानाचा संकल्प सर्वांना सांगितला. यावर घरच्यांनी आणि तिनेही आनंद व्यक्त करत सहमती दिली. गुंजन म्हणाला, देशात थॅलेसेमिया आजाराने पीडित मुलांची संख्या लाखांमध्ये आहे. परंतु त्यांच्याविषयी पुरेशी जनजागृती लोकांमध्ये नाही. म्हणूनच माझ्या मनात हा विचार आला. 

> नवरी ओसीन म्हणाली की, माझ्या होणाऱ्या नवऱ्याने आतापर्यंत 34 वेळा रक्तदान केले आहे. म्हणूनच त्यांनी लग्नातही रक्तदानाची इच्छा व्यक्त केली. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी या पुण्यकार्याला आनंदाने होकार दिला. रक्तदान हे महादान आहे. आमचे हे रक्तदान एखाद्याच्या कामी येईलच, त्याचा जीव वाचेल, यातच आमचा सर्वात मोठा आनंद आहे. ओसीन म्हणाली, गुंजन यांच्या या कामामुळे माझे लग्न खरोखर अविस्मरणीय ठरले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या अनोख्या लग्नातील काही अविस्मरणीय क्षण... 

बातम्या आणखी आहेत...