आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीने दिराशी केले लग्न, पाहा समाजापुढे आदर्श ठरलेल्या लग्नाचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - उज्जैन जिल्ह्याच्या नागदामध्ये सोमवारी शेकडो लोक एका परिवर्तनाचे साक्षीदार ठरले. येथे एका वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर सुनेचे आयुष्य पुन्हा सावरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या लहान मुलाशी सुनेचे लग्न लावले. दीर हितेशनेही आपल्या वडिलांच्या या निर्णयावर गर्व व्यक्त करत भावजयी गायत्रीसह सप्तपदी घेतली.

 

माता पूजन ते मंडपापर्यंत सर्व काही रीतिरिवाजानुसार
- सामेवारी संध्याकाळी या लग्नाच्या तयारी महिन्यापूर्वी सुरू झाली होती. यासाठी नवरीच्या लग्नाचा पोशाख ते नवरदेवाची शेरवानी स्पेशल तयार करण्यात आली होती. सोमवारी सकाळी नवरदेव हितेश आणि नवरी गायत्री माता पूजन करायला मंदिरात पोहोचले. यानंतर दुपारी 3 वाजता लग्नविधींसाठी मंडपातील कार्यक्रमात पोहाचले. यानंतर संध्याकाळी 4 वाजता नवरीला विवाहस्थळी घेऊन नातेवाइक आले आणि दुसरीकडे नवरदेवाची वरातही झोकात निघाली. वरातीत पाहुण्यांनी धमाल डान्स केला. काही वेळानंतर गायत्रीलाही स्टेजवर आणण्यात आले. यानंतर अग्निनारायणाच्या साक्षीने विधिपूर्वक लग्न संपन्न झाले.

 

अपघातात झाला होता मुलाचा मृत्यू
- 17 फेब्रुवारी 2012 रोजी बिझनेसमन राजेंद्र चौधरी यांचा मोठा मुलगा आयटी इंजिनिअर सुमीतचा विवाह जाट कुटुंबातील गायत्रीशी झाला होता. 2 जून 2014 रोजी सुमीतचा अपघातात मृत्यू झाला. वडिलांचे स्वप्न भंगलेच, सून आणि 7 महिन्यांची नात धनवीचे भविष्यही अंधकारमय झाले. मुलगा गमावल्यानंतर राजेंद्र चौधरी यांनी सुनेला तिच्या पायावर उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिचे ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. नात धनवीवरही वडिलांचे छत्र असावे म्हणून त्यांनी आपल्या लहान मुलाशीच सुनेचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. समाजाच्या परंपरा, रीती, रूढी या सर्वांना फाटा देत परिवर्तनाचा निर्णय घेऊन त्यांनी लहान मुलाचा आणि मोठ्या सुनेचा आदर्श विवाह लावला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या आदर्श लग्नाचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...