आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे बदलताना तरुणीचा बनवला MMS, मग कोचने साथीदारासह मिळून केला गँगरेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरदा (भोपाळ) - तरुणीला ब्लॅकमेल करून गँगरेप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे. पीडित तरुणी सरकारी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाची नियुक्ती केली होती. तरुणीचा आरोप आहे की, प्रशिक्षक तिची छेडछाड करत होता. यामुळे तिने क्लासला जाणे बंद केले होते आणि पर्सनल ट्रेनरकडे क्लास जॉइन केला होता. पीडिता म्हणाली, कपडे बदलताना तिचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याने दुसऱ्या कोचला दिला होता, यानंतर त्याने ब्लॅकमेल करून गँगरेप केला.

 

असे आहे प्रकरण..
- ही घटना शहरातील रहटगाव परिसरातील आहे. येथील तरुणी एका कॉलेजात शिकते. यादरम्यान कराटे कोच नीलेश सेनने तिची छेड काढली.
- सेनने तरुणीलाचा कॉलेजमध्ये कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला होता, तो त्याने तिचा नवा पर्सनल ट्रेन युसूफ मन्सुरीला दिला. मन्सुरी तरुणीला व्हिडिओचा धाक दाखवून ब्लॅकमेल करू लागला.
- पोलिसांच्या मते, दोन कराटे कोचविरुद्ध छेडछाड, गँगरेप आणि एससीएसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याचा फुटलेला मोबाइल जप्त करण्यात आला आहे. या मोबाइलचीही तपासणी केली जाईल.

 

तरुणीला व्हिडिओ दाखवून हॉटेल आणि गावात नेऊन केला गँगरेप
- कुलहरदाचा रहिवासी कराटे कोच युसूफ मन्सुरी याने तरुणीला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे तरुणी घाबरली.
- मन्सुरीने तिला व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिच्याशी लैंगिक संबंध बनवले. तो तरुणीला एकदा एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, यानंतर गावात नेऊन गँगरेप केला.
- तक्रारीनंतर पोलिसांनी युसूफ मन्सुरी आणि नीलेश सेनविरुद्ध गँगरेप, ब्लॅकमेल करणे आणि धमकावण्यासाहित अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी मन्सुरीला अटक केली असून रविवारी कोर्टात हजर केले असता त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...