आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 फूट खोल दरीतून 5 दिवसांनी जिवंत परतला तरुण, मेलेला समजून दु:खात होते कुटुंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दरीवरून खाली फेकण्यात आले होते तरुणाला. - Divya Marathi
या दरीवरून खाली फेकण्यात आले होते तरुणाला.

इंदूर - शहराच्या परदेशीपुरामधून 5 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या BSC मध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थी मृदुल मोहित भल्ला (रा. क्लर्क कॉलनी, मूळ रा. शाहगढ़ बंडा, जि. सागर) याचे प्रेम प्रकरणामुळे त्याच्याच परिसरातील 3 मुलांनी अपहरण केले. त्याला इंदुरातून 31 किमी दूर उदयनगरमध्ये मुआरा घाटावर नेऊन बेदम मारहाण केली मग दोरीने हात बांधून फेकून देण्यात आले होते. खुनाच्या उद्देशाने वरून मोठमोठे दगडही टाकण्यात आले.   

 

डॉक्टरही झाले चकित...
- SP अवधेश गोस्वामी आणि ASP प्रशांत चौबे म्हणाले की, शुक्रवारी सकाळी 7 वाजता गावकऱ्यांसोबत पोलिस जवान डोंगरातील मार्गावरून 1 किमी दूर खाली झाडांच्या फांद्या धरून घटनास्थळी पोहोचले.
- पोलिस इन्स्पेक्टर वीरेंद्र सिंह म्हणाले की, घटनास्थळावरून 400 फूट खोलीवर मृदुलचे कपडे आढळले. खाली उतरायला तब्बल 45 मिनिटे लागली, पाहिले तेव्हा मृदुल डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याच्या सुकलेल्या नाल्यामध्ये पोटावर पडलेला आढळला.
- त्याला सरळ केले तेव्हा त्याच्या तोंडातून वेगाने हवा निघाली. जिवंत असल्याचे पाहून तेथे डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. दुपारी 12 वाजता त्याला वर आणून रुग्णालयात हलवण्यात आले.

- पोलिसांनी सांगितले की, 7 जानेवारीच्या दुपारी 2 वाजता मृदुलला फेकले होते आणि 12 जानेवारीला त्याला जिवंत काढले तेव्हा डॉक्टरही चकित झाले.

 

यामुळे वाचला जीव...
- डॉक्टर म्हणाले, मृदुलचे हात-पाय थंडीमुळे आखडले होते. त्याच्या फुप्फुस, हृदय आणि लिव्हरला जास्त दुखापत नव्हती. 
- दगडांमुळे जखमा झाल्या परंतु पोटावर पडल्याने ब्लीडिंग थांबली होती. जखमांमध्ये इंफेक्शनही झाले नव्हते. श्वास घ्यायलाही त्रास झाला नाही, म्हणूनच तो जिवंत वाचला.

 

प्रेयसीचा काका बनून भेटायला बोलावले...
- मुख्य आरोपी आकाश राजू रत्नाकर (24) क्वीन्स टॉवर नौलखा येथील राहणारा आहे. त्याला मृदुल त्याच्या प्रेयसीशी बोलत असल्याचा संशय होता.
- त्याने मित्र विजय सीताराम परमार (20) आणि रोहित ऊर्फ पीयूष सुरेश परेता (23) यांच्यासह मिळून आपल्या भावाच्या स्विफ्ट कारधमून मृदुलचे अपहरण केले होते.
- मृदुलचा रूममेट सौरभ सेन म्हणाला की, 7 जानेवारीला तो नाश्ता करून येतो असे म्हणून निघाला होता. 
- त्याला आकाशने एका दूधवाल्याची गाडी थांबवून त्याच्या मोबाइलवरून फोन करून प्रेयसीचा काका बनून भेटायला बोलावले होते. 

- तो सांगितलेल्या स्थळावर पोहोचताच त्याचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पलासिया चौकात कॅमेऱ्यात एक संशयित कार दिसली.

 

डॉक्टर म्हणाले डोके, हृदय, फुप्फुस आणि लिव्हरला गंभीर दुखापत न झाल्याने वाचला जीव...
- गावकरी राजेंद्र ठाकूर म्हणाले की, दरीतून 3 जणांचा मृतदेह काढलेला आहे. जेथून मृदुलला फेकण्यात आले, तेथून कुणीच जिवंत वाचू शकत नाही. हा चमत्कारच आहे.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...