आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facebook Friend Made A 16 Year Old Girl Drug Addict And Started To Blackmail Her

Facebook फ्रेंडने लावले ड्रग्सचे व्यसन; वारंवार कापायची हात, घरातच चोरी, झाले असे हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - रुग्णालयात उपचार घेत असलेली ही अवघ्या 11 व्या वर्गातील तरुणीचे हे हाल तिच्या एका फेसबूक फ्रेंडने केली आहे. ती अमली पदार्थांच्या आहारी गेली. हळू-हळू तिची अवस्था इतकी वाइट झाली की ती यासाठी काहीही करण्यास तयार झाली. त्या फ्रेंडने हिला ब्लॅकमेल करून तिच्याच घरात चोरी करायला लावली. घरच्यांसोबत भांडायला मजबूर केले. यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. कित्येकवेळा तिने आत्महत्या करण्याच्या नादात आपल्या हातावर ब्लेड मारल्या आहेत. यानंतर कुटुंबियांनी संजीवनी हेल्पलाइनवर याची माहिती दिली आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 


दिवसभर फेसबूकवर, शिक्षणही बंद
क्राइम ब्रांच एएसपी अमरेंद्र सिंह चौहाण यांनी सांगितल्याप्रमाणे, संजीवनी हेल्पलाइन 7049108080 वर माहिती मिळाली होती. हे पती-पत्नी नोकरी करतात. घरात त्यांची 16 वर्षीय मुलगी एकटीच राहायची. एकटेपणा दूर करण्यासाठी तिने आपला संपूर्ण वेळ फेसबूकमध्ये घालवण्यास सुरुवात केली. यावरूनच ती अनेक लोकांच्या संपर्कात आली. त्यामध्ये अमली पदार्थ तस्कर आणि दलालांचाही समावेश होता. त्यांनी या मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावले.


आपल्याच कुटुंबियांना मारहाण करायची...
टीमने या विद्यार्थिनीची काउंसलिंग सुरू केली. त्यावेळीच तिच्या फेसबूक फ्रेंडची माहिती समोर आली. ती फ्रेंड एक तरुणी होती जी ड्रग्स घ्यायची. दोघींमध्ये रोज संपर्क झाला आणि मैत्री वाढत गेली. यानंतर या दोघी एकत्रित बसून ड्रग्स घ्यायला लागल्या. आपल्या फेसबुक फ्रेंडप्रमाणेच ती सुद्धा व्यसनी बनली होती. ती अमली पदार्थ घेत असल्याची माहिती फक्त त्या फ्रेंडला होती. यानंतर तिने या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेल करताना ती या विद्यार्थिनीला आपल्याच कुटुंबियांना मारहाण करण्यासाठी मजबूर करायची. कित्येकवेळा तिने घरच्यांवर हल्ला करून अर्ध्या रात्री पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, या हेल्पलाइनने तिला व्यसनातून बाहेर काढले.

बातम्या आणखी आहेत...