आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या हल्ल्यात चार पोलिस शहीद, 11 जखमी; अबूझमाडच्या सीमेवर चकमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी जवानाना रायपूर येथे आणण्यात आले आहे. - Divya Marathi
जखमी जवानाना रायपूर येथे आणण्यात आले आहे.

जगदलपूर- छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील इरपानारच्या जंगलात बुधवारी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात ४ पोलिस शहीद तर ११ जखमी झाले आहेत. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. इरपानार अबूझमाडच्या सीमेवर आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी डीआरजी आणि एसटीएफचे एक पथक निघाले होते. दुपारी १२ वाजेनंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पथक जंगलात गेल्यानंतर हल्ल्याची तीव्रता वाढली. दोन्ही बाजूंनी बराच वेळ चकमक सुरू होती. यात दोन उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबलने जागेवरच अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे नारायणपूरच्या इरपानारमध्येही ६ जखमी जवानांना मोठ्या मुश्किलीने कॅम्पपर्यंत आणण्यात आले. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना जगदलपूरच्या मेडिकल कॉलेजपर्यंत नेण्यात आले. 

 

नक्षली पुन्हा सक्रिय
अनेक दिवस शांत राहिल्यानंतर नक्षलींनी  हा  हल्ला केला. दोन दिवसांत पोलिसांनी ऑपरेशन प्रहारमध्ये सहा नक्षलींचा  खात्मा केला होता. यानंतर पूर्ण नक्षलवादी बॅकफूटवर आले होते. पोलिसांनी ही मोहीम बस्तरमध्ये राबवण्यास सुरुवात केली हेाती. या मोहिमेदरम्यान किमान एक डझन नक्षलवादी मारले गेल्यानंतर त्यांनी पोलिसांवर पलटवार केला.

बातम्या आणखी आहेत...