आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात जिवंत गाडले गेले 4 जण, खाणीत अशी फसली होती महिला- PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - बैतूल जिल्ह्याच्या सारणीमध्ये रविवारी अनेक वर्षांपासून बंद असलेली कोळशाची खाण खचल्याने 3 महिला आणि एक 11 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. घटनेदरम्यान एका महिलेला वाचवण्यात यश आले. वास्तविक, ही महिला खाण खचल्यानंतर मातीत फसली होती. तिने वाचवण्यासाठी मोठमोठ्याने आरडाओरड केली. यानंतर आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. महिलेला वाचवल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले, यानंतर जेसीबीने खोदकाम करून चिमुकली आणि महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

 

बंदी असूनही खदानीतून सात्याने खोदकाम जारी
- सारणीमध्ये खाण खचल्याच्या घटना दुपारी एक वाजता घडली. 4 महिला आणि चिमुकली खाणीतून कोळसा खोदताना जास्त खोल गेल्या होत्या. यादरम्यान खाण खचली.
- बंद खाणीत धोक्याच्या इशाऱ्यासाठी बोर्डही लावण्यात आलेले आहेत, परंतु आसपासच्या गरीब कुटुंबातील महिला नेहमी येथे कोळसा खोदण्यासाठी येतात.

 

यांचा झाला मृत्यू...

-11 वर्षीय चिमुकली तायल देशमुख, शीलू चौरसिया (45), मीना शिवपाल (32), नानीबाई पारे (35) यांचा मृत्यू झाला आहे, तर संध्या डेहरिया (33) यांना वाचवण्यात यश आले आहे.

 

प्रशासनाने काय उचलले पाऊल?
- बैतूलचे कलेक्टर शशांक मिश्र म्हणाले, "मृतांच्या नातेवाइकांना बीपीएल मदतनिधीतून 20-20 हजारांची मदत देण्यात आली आहे. आम्ही बंद खाणींच्या फेन्सिंगसाठी डब्ल्यूसीएलशी बातचीत करू. यामुळे यापुढे अशा अपघातांना अटकाव करता येईल."

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, या भीषण घटनेचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...