Home | National | Madhya Pradesh | Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कारानंतर झुडपात फेकली पँट, दगडाने ठेचून केला निर्घृण खून

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 20, 2017, 02:02 PM IST

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील मनावरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कारानंतर तिचा खून करण्यात आला.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp
  चिमुकलीच्या मृतदेहापासून 100 मीटर अंतरावर तिची जीन्स आणि रक्ताने माखलेला दगड आढळला.

  इंदूर - मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील मनावरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कारानंतर तिचा खून करण्यात आला. चिमुकलीच्या शेजारी राहणारा 18 वर्षीय करण तिला 400 मीटर अंतरावरील खड्ड्यात घेऊन गेला. येथे त्याने तिच्यावर बलात्कार केला, नंतर नाव सांगण्याच्या भीतीने तिच्या डोके दगडांवर आपटून बालिकेचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशीत आरोपी म्हणाला की, त्याला चिमुकलीच्या वडिलांकडून 500 रुपये घ्यायचे होते, तो देत नव्हता म्हणून त्याने मुलीचा खून केला. तथापि, मुलीच्या वडिलांनी पैशांचा कोणताही व्यवहार असल्याचे नाकारले आहे.

  नदी किनारी आढळलेल्या चपलेने पटली आरोपीची ओळख...
  - आरोपीने शुक्रवारी संध्याकाळी बलात्कारानंतर हत्या केली होती. शनिवारी काही महिला नदीवर गेल्यावर मृतदेह आढळला. तिथे 100 मीटर अंतरावरील झुडपाच्या मधोमध एका खड्ड्यात जीन्स आणि रक्ताने माखलेले दगड पडलेले होते. जवळच चप्पल पडलेली होती, जी आरोपीची होती. करणने काही दिवसांपूर्वीच ही नवी चप्पल आणली होती, ती त्याने सर्वांना दाखवलीही होती. त्याला बोलावले तेव्हा तो घरात जाऊन लपून बसला. एसडीओपी आनंदसिंह वास्केल आणि पोलिस स्टेशन इंचार्ज संजय रावत पोहोचले तर त्यांना करणबाबत कुटुंबीयांनी सांगितले. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला. म्हणाला, गल्लीत मुलीला खेळवत होतो, तेव्हा माझी नियत बिघडली.

  नशेत धूत आरोपीला रात्री विचारले- मुलगी कुठेय? म्हणाला- ठोक दिया... ठोक दिया..
  - घटना ज्या जगन्नाथपुरामध्ये झाली तेथे 20 ते 25 कुटुंबे राहतात. शुक्रवारी कामाला सुटी असल्याने मुलीचे वडील आठवड्याभराचा किराणा आणि मुलांसाठी खाऊ आणायला गेले होते. मुलगी आणि तिची मोठी बहीण कचोरी आणि शेव खात होत्या. जवळच राहणारे दोन्ही मुलींचे मामाही घरगुती कार्यक्रमासाठी आलेले होते. मुलगी हातात थैली घेऊन शेव खात होती. तेवढ्यात गल्लीत सायकल चालवत असलेल्या करणने तिला उचलून नेले. संध्याकाळी 6.30 वाजता चिमुकली दिसली नाही म्हणून तिच्या आईने शोध घेणे सुरू केले. अंधार वाढू लागला, पण मुलीचा पत्ता लागला नाही. पूर्ण गल्लीत नदीकिनारीही शोधले पण मुलगी सापडली नाही. मुलीच्या मोठ्या बहिणीने घरच्यांना सांगितले की, तिला करणने उचलून नेताना पाहिले होते. रात्री कुटुंबीय आरोपी करणकडे गेले, तो नशेत तर्रर होता आणि झोपलेला होता. उठवून मुलीची विचारपूस केली तर म्हणू लागला- ठोक दिया... ठोक दिया. नशेत तर्रर समजून तेव्हा त्याचे बोलणे कुणी गांभीर्याने घेतले नव्हते.

  मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी नेले
  - डॉ. के. सी. राणे यांनी पोस्टमॉर्टममध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्टचा सल्ला घेण्याचा विचार व्यक्त केला. पोस्टमॉर्टम किचकट आढळल्याने मृतदेहाला एमवाय रुग्णालय इंदूरला नेण्यात आले. माहिती मिळताच आमदार रंजना बघेल घटनास्थळी पोहोचल्या. मृत मुलीच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन करून धीर दिला. पोलिसांनी कलम 302, 376, 363, पॉक्सो अॅक्टअंतर्गत प्रकरणाची नोंद केली आहे.

  आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल...
  - आम्ही आरोपीला लवकरात लवकर शिक्षा कशी होईल हे पाहू. 15 दिवसांत तपास पूर्ण करून चार्जशीट न्यायालयात दाखल केली जाईल. मनावर पोलिसांनी तत्काळ आरोपीला शोधून उल्लेखनीय काम केले आहे.
  - वीरेंद्रसिंह, एसपी, धार.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  मनावरमध्ये 4 वर्षीय बालिकेवर बलात्कारानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  शेजारीच राहणाऱ्या आरोपीने बलात्कारानंतर हत्या केल्याचे कबूल केले.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  चिमुकलीचे डोके दगडाने ठेचलेले होते.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  खूपच निर्घृण खून करण्यात आला बालिकेचा.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  बालिकेच्या मृतदेहाजवळ पडलेला दगड.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  कुटुंबीयांचे सांत्वन करताना आमदार.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  नदीकिनारी झुडपात आढळले कपडे.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  घटना वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची गर्दी जमली.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  आरोपीची चप्पल.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  अामदारांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून धीर दिला.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  पोलिस तपास करताना.

 • Four Year Old Girl Crushed With Stone After Misbehave And Killed Dhar Mp

  बालिका, जिची हत्या करण्यात आली.

Trending