आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindu Does Not Speak Of Terrorism; Digvijay Singh Said Tell Me What Muslims Call Me, Who Is Big Hindu To Me ..?

मी हिंदू नाही तर संघीय दहशतवादावर बोललो, कोणताही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही - दिग्विजय सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर (मध्यप्रदेश) - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे, की मी कधीही हिंदू दहशतवादाबद्दल बोललो नाही. ते म्हणाले, 'मी संघी दहशतवादाबद्दल बोलत आलो आहे. दहशतवादाला कोणत्याच धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. कोणत्याही दहशतवादी घटनेला धर्माशी जोडता येणार नाही.' कोणताही धर्म हा दहशतवादाचे समर्थन करत नाही, असेही दिग्विजय सिंह म्हणाले. जे लोक मला मुस्लिम समर्थक म्हणतात, अशा लोकांकडून मला हिंदू असण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी हिंदू म्हणून जे काही केले त्याची ते बरोबरीही करु शकत नाही, असा दावा करत दिग्विजय सिंह म्हणाले, त्यांनी काही माझ्यासोबत नर्मदा परिक्रमा, मथुरा परिक्रमा केलेली नाही. 

 

- दिग्विजय सिंह शुक्रवारी सागरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. भाजप जाती-धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, 'भाजप जाती-धर्माचे राजकारण करत आहे. धर्माच्या नावावर पैसा गोळा करुन, विषवल्ली पसरवण्याचे त्यांचे काम आहे.'
- मध्यप्रदेशात आज वीज,रस्ते आणि पाणी आहे ते माझ्या कार्यकाळात झालेल्या कामामुळे असा दावा दिग्विजय सिंहांनी केला. ते म्हणाले, 'राज्यात वीज, रस्ते आणि पाणी दिसत आहे ते माझ्या कार्यकाळात झालेल्या कामामुळे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सरकारी पॉवर प्लॅंटची पायाभरणी झाली होती, त्यामुळे आज राज्यात वीज आहे. रस्त्यांसाठी बीओआरटीचा फॉर्म्यूला मी दिला होता. सत्ता मिळाल्यानंतर भाजपने या योजनेला आपले नाव दिले आहे.'
- दिग्विजय सिंह म्हणाले, 'भाजप पहिले हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावत होती. आता त्यांनी जनरल, ओबीसी आणि मागास समाजामध्ये वाद लावण्यास सुरुवात केली आहे.'

 

भाजप सरकारचे भ्रष्टाचाराचे 15 वर्ष 
- दिग्विजय सिंहांनी आरोप केला की भाजप सरकारने 15 वर्षांत भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही. 
- ते म्हणाले, 'राज्यात देशातील सर्वात मोठा व्यापमं घोटाळा झाला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक झाली. नुकतेच यांनी टेंडरसाठी वेबसाइट तयार केली. ई-प्रोक्योरमेंट या साइटमध्येही घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.'
- दिग्विजय सिंह म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. 

 

दारुवर दिग्गीराजांची चुप्पी, म्हणाले- पक्ष निर्णय घेईल 
- मध्यप्रदेशात या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर दारुबंदीचा निर्णय होईल का, या प्रश्नावर दिग्विजय सिंहांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. ते म्हणाले, 'दारु ही चांगली नाही. मात्र दारुबंदीचा निर्णय पक्षाची कोअर कमिटी घेऊ शकते.' 

बातम्या आणखी आहेत...