आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4 महिन्यांच्या बालिकेची बलात्कारानंतर हत्या, आरोपीचे मुलीच्या आईसोबत झाले होते भांडण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - 4 महिन्यांच्या एका मुलीवर तिच्या आईच्या मावसाने बलात्कार करुन हत्या केली आहे. आरोपीने राजवाडा येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्या आई-वडीलांसोबत झोपलेल्या 4 महिन्यांच्या मुलीला शुक्रवारी पहाटे उचलून नेले. नराधम मुलीला श्रीनाथ पॅलेस बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. तिथे चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर, त्याने तिला वरुन फेकून दिले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हे दुष्कृत्य घडले त्यापासून अवघ्या 200 पावलांवर असलेल्या पोलिसांना याचा थांगपत्ता नव्हता. शुक्रवारी उशिरा रात्री आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या पत्नीने त्याला आधीच सोडलेले होते. दोघांमध्ये समेट करुन देण्यासाठी गुरुवारी रात्री तो मुलीच्या आईकडे आला होता. त्यावरुनच मुलीच्या आईसोबत त्याचे भांडण झाले होते. तेव्हा पोलिसांनी त्याला एक-दोन दंडुके मारून हकलून दिले होते. घटनेच्या 8 तासानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. 

 

सीसीटीव्हीमध्ये मुलीसोबत दिसला आरोपी
- डीआयजी म्हणाले, राजवाडा येथे कुटुंब झोपलेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात आरोपी युवक शुक्रवारी पहाटे 4.45 वाजता मुलीला सायकलवरुन घेऊन जाताना दिसत आहे. 15 मिनिटानंतर तो एकटात परतला. 

 

तक्रार देण्यासाठी गेलो तर पोलिस म्हणाले- दुपारी या
- मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलीचा मामा घटनास्थळी पोहोचला. त्याने सांगितले, की मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आम्ही सकाळीच पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो. तिथे हजर असलेल्या पोलिसांनी आम्हाला तक्रार देण्यासाठी दुपारी येण्यास सांगून बाहेर काढले होते. 
- मुलगी बेपत्ता असल्याची सूचना मिळाल्यानंतरही पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती. या प्रकरणी डीआयजींनी सराफा पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार त्रिलोकचंद बरकडे यांना निलंबति केले आहे. 
- मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर जवळपास दीड तास वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही. पोलिस कर्मचारीच चौकशी करत होते. दीड तासानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत मुलीचा मृतदेह घटनास्थळावरुन रवाना करण्यात आला होता. त्यानंतर डीआयजी हरिनारायणचारी मिश्र घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला. 

 

या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यासाठी विधायम मंजूर झाले पाहिजे - शिवराज 
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी ट्विट करुन या नराधमांना फाशी झाली पाहिजे असे म्हटले आहे. ते म्हणाले, 'इंदूरच्या घटनेने ह्रद्य पिळवटून निघाले आहे. एवढ्या लहान मुलीसोबत एवढे दुष्कृत्य. समाजाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. प्रशासनाने आरोपीला अटक केली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करु.'

बातम्या आणखी आहेत...