आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ARMY तील रायफलमॅन \'ऑन डिमांड\' बोलवत होता कॉलगर्ल्स, मुंबईतील 3 तरुणींसह एकाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- शहरातील उच्चभ्रु परिसरा‍त सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. पोलिसांनी मुंबईहून आलेल्या तीन कॉलगर्लसह दलाल आणि एका ग्राहकाला अटक केली आहे. महिला पोलिस पथकाने शाहपुरा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

 

लष्करात राजस्थान रेजीमेंटमध्ये रायफलमनचा आरोपींमध्ये समावेश आहे. तो ऑन डिमांड दिल्ली, मुंबई, बिहार, गुजरातहून कॉलगर्ल्स मागवत होता. कॉलगर्ल्सला आठ-दहा दिवस शहरात थांबवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होता. दरम्यान महिनाभरापूर्वी नव्या शहरात पाच सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला होता.

 

कारच्या मागील सीटवर आक्षेपार्ह अवस्थेत सापडले कॉलगर्ल आणि ग्राहक

पोलिस निरीक्षक (दक्षिण) राहुल लोढा यांनी सांगितले की, दानापानी रेस्तराँजवळ एका कारमधून कॉलकर्ल आणि ग्राहकाला अटक करण्‍यात आली. पोलिसांनी कारही ताब्यात घेतली आहे. ही कार अर्जुन पाल (वटय-28, सहस्त्रबाहु नगर, मिसरोद) यांची आहे. कारचालक दिलीप कुमार गोयल (वय-32) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारच्या मागील सीटवर अर्जुन आणि मुंबईहून आलेली कॉलगर्ल आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. 

 

शाहपुरा पोलिस आणि महिला पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख पाच हजार रुपये, तीन मोबाइल फोन आणि आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्‍यात आल्या आहे.

 

दिल्ली, मुंबई, गुजरातमधील दलालही होते संपर्कात...
अटक करण्यात आलेल्या कॉलगर्ल मुंबईतील ठाण्यातील राहाणार्‍या आहेत. मुख्य आरोपी दिलीप गोयल याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका दलालाच्या माध्यमातून कॉलगलर्ल्सला भोपाळ येथे बोलावले होते. प्रत्येक ग्राहकाकडून 8-10 हजार रुपये घेतले जात होते. यातीर चार हजार रुपये कॉलगर्लच्या बँक खात्यात डिपॉझिट केले जात होते. उर्वरित रक्कम दिलीप आणिश दलाल आपापसात वाटून घेत होते.

 

दिलीप गोयल मुंबईसह गुजरात, बिहार आणि दिल्लीतील काही दलालांच्या संपर्कता आहे. तो ऑन डिमांड कॉलगर्ल्स मागवत होता.

 

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी करायचा संपर्क...

दिलीप गोयल याचा मोबाइल नंबर गुगलवर 'एस्कॉर्ट सर्व्हिसेस भोपाळ' टाईप केल्यानंतर सहज उपलब्ध होतो. याशिवाय व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर देखील त्यांनी प्रोफाइल बनवले आहे.

 

दिलीप गोयल हा 2003 मध्ये लष्कराच्या राजस्थान रे‍जीमेंटमध्ये रायफलमन पदावर रुजू झाला होता. त्याने 2011 मध्ये व्हीआरएस घेतला आणि तेव्हापासून त्याने हा गोरखधंदा सुरु केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...