आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सतना- लग्नास कारने चाललेल्या एका कुटुंबास ट्रकने चिरडले. या अपघातात नवरदेव, चार लहान मुली व कारचालक असे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री नरोडा गावाजवळ घडला.
नवरदेवाची ओळख पटली असून त्याचे नाव ब्रिजमोहन कोल (22) असे आहे. अपघातातील दोन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भयानक होता की ट्रकपासून कार वेगळी करण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.
मृतदेहांचा कारमध्येच चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरची मदत घ्यावी लागले. कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमरपाटनमधील उमराही टोलाहुन आदिवासी समाजाची वरात मैहरमधील अमिलिया येथे जात होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास नरोडा गावाजवळ भरधाव ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. त्यात कार चक्नाचूर झाली. या घटनेनंतर लगीनघरी स्मशान शांतता पसरली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.