आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षात समोर होता मृत्यू...जीव मुठीत घेऊन खडकावर उभे होते तब्बल 3 तास!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 श्योपूर- मध्य प्रदेशातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. श्योपूर येथे झालेल्या मुसळधार पावसात मोरडूंगरी नदीला बुधवारी (ता.26) पूर आला. अंघोळीसाठी गेलेले दोन तरुण नदी पात्रात अडकून पडले. साक्षात मृत्यू आपल्या समोर उभा असल्याचा अनुभव त्यांनी घेतला असावा. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाने दोघांना वाचवले.

 

आरिफ (22) आणि प्रेम (28, दोघेही रा. गांधी नगर) हे दोघे मित्रा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. नदीवर पोहोचले तेव्हा पाणी कमी होते. परंतु अचानक मुसळधार पाऊस झाला आहे. डोंगराळ भागातून वाहून आलेल्या पाण्याने नदीला पूर आला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... Video: जीव मुठीत घेऊन खडकावर उभे होते तब्बल 3 तास...

बातम्या आणखी आहेत...