आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटींच्या जुन्या नोटांची डिलेव्हरी देण्यासाठी औरंगाबादहून सूरतला जाणार्‍या तिघांना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची डिलेव्हरी देण्यासाठी औरंगाबादहून सूरतला निघालेल्या तिघांना इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. खंडवा एटीएसकडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे भंवरकुआं पोलिसांनी तीन इमली ब्रिज परिसरातून तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींकडून एक हजाराच्या 83 लाख तर 500 च्या 17 लाख जुन्या नोटा जप्त करण्‍यात आल्या आहेत.

 

एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले की, हबीब खान (अहमदाबाद), सैयद इमरान एमआर (भुसावळ) आणि सैयद शोएब (सुरत) अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. हबीब खान हा आयुर्वेदिक उपचार करतो, सैयद इमरानचा एमआर व प्रॉपर्टी व्यवसाय असून सैयद शोएब हा सुरतमध्ये एका साड्यांच्या दुकानात काम करतो. खंडवा एटीएसकडून मिळालेली माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तिघांची कसून चौकशी सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...