आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज कॅबिनेटचा दुसरा विस्तार: 3 जणांचा मंत्रिमंडळात समावेश, सर्व जाती-धर्मांना प्रतिनिधित्वाचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळाचा शनिवारी कॅबिनेट विस्तार झाला. त्यांच्या कार्यकाळातील हा दुसरा विस्तार आहे. यामध्ये सर्व जाती-धर्मांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न चौहान यांनी केला आहे. काछी समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी ग्वाल्हेर (दक्षिण) येथील आमदार नाराणयसिंह कुशवाह, लोधी सामाजाकडे लक्ष ठेवत नरसिंहपूरचे आमदार जालम सिंह पटेल आणि पाटीदार समाजाचे खरगोनचे आमदार बालकृष्ण पाटीदार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे याचवर्षी मध्यप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. 

 

अनेकदा टळला विस्तार 
- मध्यप्रदेशातील भाजप शासित सरकारचा विस्तार अनेकदा टळला आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चौहान सरकारचा विस्तार शनिवारी झाला. 
- तीन नावे आधीच ठरलेली होती, मात्र एस.सी किंवा एस.टी समाजातील उमेदवाराशिवाय इंदूरला प्रतिनिधीत्व देण्यासाठी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांच्यासह संघटनेच्या अनेक नेत्यांनी चर्चा केली. 
- या चर्चेअंती अखेर तीन नावेच फायनल करण्यात आली. 
- सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी दुपारीच राजभवनास सूचना दिली होती. 
- कारण राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना शनिवारी लवकर गुजरातला जायचे असल्याने शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

- भाजपचे राज्य प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे ही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 

 

जालम यांच्यावर हत्येचा आरोप 
- माजी केंद्रीय मंत्री आणि दमोह येथील विद्यमान खासदार प्रल्हाद पटेल यांचे बंधू जालम सिंह पटेल यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा खटला सुरु आहे. 
- जालम सिंह यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पुतण्या मोनू पटेलसह इतरांना सोबत घेऊन मुकेश चौकसे नावाच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला होता. 

बातम्या आणखी आहेत...