आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maggi खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 10 जण आजारी, डॉक्टरांनी दिला हा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छतरपूर (एमपी) - मॅगी नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांना चक्क रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. यामध्ये 8 चिमुकल्यांसह एक पुरुष आणि एका वृद्धेचा समावेश आहे. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतरही काही सुधारणा होत नसल्याने त्यांना रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीला ग्वाल्हेर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात स्थलांतरित करावे लागले आहे. 


मॅगी खाताच तब्येत बिघडली...
- छतरपूर येथील नागाव परिसरात राहणाऱ्या लहान मुलांनी मॅगी खाण्याचा आग्रह धरला होता. यानंतर शनिवारी संध्याकाळी पालकांनी बाजारातून मॅगीचे पॅकेट विकत आणले होते. या कुटुंबातील 8 मुले-मुली आणि एका महिलेसह युवकाने मॅगी खाल्ली होती. 
- मॅगी खाल्ल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच सर्वांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने नौगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
- या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जिया फातिमा यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही वेळ मुलांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचा भास झाला. परंतु, अचानक पुन्हा त्यांची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच शनिवारी रात्री त्यांना जिल्हा रुग्णालय तर रविवारी रात्री ग्वाल्हेर मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले.


डॉक्टर काय म्हणाले?
जिला रुग्णालयातील डॉ. सुनील चौरसिया यांनी सांगितल्याप्रमाणे, मॅगी काही दिवस किंवा बुर्शी लागलेली असल्यास ती मुळीच खाऊ नये. अशा प्रकारचे फूड खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते. फूड पॉइझनिंगने पोटात तीव्र वेदना, उल्ट्या होणे, हाडांना त्रास होणे अशा समस्या होऊ शकतात. विशेष म्हणजे, या कुटुंबियांनी दुकानातून आणलेल्या पॅकेटमधून मॅगी केली होती. त्यामुळे, या फूडमध्ये एखादे विष मिश्रित झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...