आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंगरौली (मध्यप्रदेश) - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील ते सांगता येत नाही. सिंगरौली येथील सभेत मुख्यमंत्री भाषण करत असताना एक फोन कॉल आला आणि राष्ट्रीय पातळीवर शिवराजसिंह चौहानांची चर्चा सुरु झाली. हा फोन कॉल होता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, तोही लंडनहून. या दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचीत झाली हे कळू शकले नाही, मात्र पंतप्रधानांच्या फोनमुळे शिवराजसिंह चर्चेत नक्कीच आले.
शिवराजसिंह सिंगरौली येथे तेंदुपत्ता बोनस वितरणासाठी आले होते. जाहीर सभेला मुख्यमंत्री संबोधित करत असताना त्यांच्या गार्डकडे असलेला मोबाइल फोन खणाणला. गार्ड लागलीच शिवराजसिंहाजवळ आला, मात्र शिवाराजसिंहांनी प्रथम फोन स्वीकारण्यास नकार दिला. मात्र जेव्हा त्यांना सांगितले गेले की नरेंद्र मोदींचा फोन आहे, तेव्हा भाषण थांबवत, लागलीच फोन हातात घेत डायसपासून दूर जात शिवराजसिंहांनी मोदींसोबत गुफ्तगू केले.
या फोननंतर मध्यप्रदेश भाजप अध्यक्ष बदलले गेल्याची बातमी आली आणि मुख्यमंत्र्यांचा फोन कॉल चर्चेत आला.
नंतर फोनची रिंग वाजतच राहिली...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राष्ट्रकूल देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीसाठी लंडनला गेले आहेत.
- पंतप्रधानांचा फोन आहे म्हटल्यावर शिवराजसिंह यांनी उपस्थितांना हात उंचावून दोन मिनिटांचा ब्रेक घेत असल्याचे सांगितले. स्टेजवरुन खाली उतरून त्यांनी फोनवरुन पंतप्रधानांसोबत चर्चा केली.
- शिवराजसिंह मंचावर आले आणि पुन्हा फोनची घंटी वाजली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि भाजपाध्यक्ष अमित शहा लाइनवर होते. त्यांच्यासोबतही सीएमने चर्चा केली.
- या दोन्ही फोननंतर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा सूर बदलला.
यासाठी आला होता पीएमचा फोन
- सुप्रीम कोर्टाने गुरुवारी जस्टिस बी.एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करणारी याचिका फेटाळली. यानंतर भाजपने काँग्रेसवर षडयंत्राचा आरोप केला होता. त्यासोबतच भाजपशासित सर्व राज्यात हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी पीएम, गृहमंत्री आणि अमित शहा यांनी भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन केले होते.
- या फोननंतर शिवराजसिंह यांच्या भाषणाचा सूर बदलला. अचानक ते राहुल गांधींवर घसरले आणि संपूर्ण भाषणात राहुल गांधींवर टिका सुरु झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.