आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त एअरफोर्स ऑफिसर अन् पत्नीची निर्घृण हत्या, संशयावरून पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृद्ध दांपत्याच्या हत्येनंतर पोलिसांना भिंतीवर रक्ताचे शिंतोडे आढळले. - Divya Marathi
वृद्ध दांपत्याच्या हत्येनंतर पोलिसांना भिंतीवर रक्ताचे शिंतोडे आढळले.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजधानीत निवृत्त एअरफोर्स ऑफिसर (73 वर्षे) आणि त्यांच्या पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. दोघांचेही मृतदेह शुक्रवारी सकाळी बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरवर बेडरूमजवळ आढळले. पोलिसांनी चोरी व दरोड्यादरम्यान हत्या झाल्याचे नाकारले आहे. तपासादरम्यान बंगल्यातील कोणतेही सामान विखुरलेले आढळले नाही. पोलिसांच्या मते, डबल मर्डरमध्ये एखादी जवळची व्यक्ती सामील असल्याचा संशय आहे. यानंतर रात्री उशिरा एकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. हत्या करणाऱ्याने दोघांच्या गळ्यावर फक्त एक-एक वार केले, म्हणजेच ही नियोनपूर्वक केलेली हत्या होती, असे पोलिस म्हणताहेत.
 
शेजाऱ्यांनी रात्री उशिरा ऐकल्या किंकाळ्या... 
- सूत्रांनुसार, भोपाळच्या अवधपुरी येथील नर्मदा व्हॅली कॉलनीतील एका बंगल्यात जी. के. नायर आणि त्यांची पत्नी गोमती (निवृत्त नर्स) राहत होते. गुरुवारी रात्री 9.30 वाजता नायर यांनी आपली सर्वात लहान मुलगी प्रियंकाला फोन करून शुक्रवारी ग्वाल्हेरसाठी रिझर्व्हेशन करण्यासाठी सांगितले होते. यादरम्यान घरी सर्वकाही नॉर्मल होते.
 
- रात्री 12.00 वाजता शेजारी राहणाऱ्या रत्ना मिस्त्री यांनी नायर यांच्या घरातून ओरडण्याचे आवाज ऐकले. त्यांनी नायर यांच्या घरी फोन केला, पण तो रिसीव्ह झाला नाही. यानंतर कोणतेही आवाज आले नाहीत. रत्ना यांच्या मते, नायर आणि त्यांच्या पत्नी नेहमी मोठ्या आवाजात बोलायाचे. म्हणून मी याकडे जास्त लक्ष दिले नाही.
 
पोलिस मोलकरणीचाही घेताहेत शोध
- शुक्रवारी सकाळी 8 वाजता नायर यांच्या घरी काम करणाऱ्या मोहनबाई घरी पोहोचल्या. व्हरंड्यातील गेटला टाळे लागलेले होते. यावर मोहनबाई यांनी हाक मारली, पण काहीच उत्तर आले नाही. हे ऐकून शेजारी आपल्या बंगल्यातून नायर यांच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीत गेले. त्यांना दाराला जोरात ढकलल्यावर ते उघडले. आता वृद्ध दांपत्य रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेले होते.
- ही घटना रात्री 9.30 ते 12 वाजेदरम्यान झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. बहुतेक त्यांच्या ओळखीच्याच व्यक्तीचा या घटनेत हात असावा, असाही त्यांचा संशय आहे. या दांपत्याच्या घरी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नोकराचाही शोध घेतला जात आहे.
 
एकाला घेतले ताब्यात...
- प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी राजू नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची पत्नी आरतीला वृद्ध दांपत्याने 8 वर्षे सांभाळले होते. राजूने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी नायर यांच्याकडून दीड लाख रुपये उधार घेतले होते. आरतीचा पती असल्याने तो त्यांच्या घरी नेहमी येत-जात होता.
- घटनेनंतर त्याला जेव्हा फोन करण्यात आला तेव्हा राजूने तो ग्वाल्हेरमध्ये असल्याचे सांगितले. काही वेळानेच त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. यानंतर पोलिसांनी सापळा रचून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. पोलिसांना राजूवर संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...