आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्याने सुनेला केले ग्रॅज्युएट; आता दिराशी होणार लग्न, रूढी-परंपरांना दिला फाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायत्री यांच्या पतीचे रस्ते अपघातात निधन झाले होते. - Divya Marathi
गायत्री यांच्या पतीचे रस्ते अपघातात निधन झाले होते.

नागदा (इंदूर) - नागदामध्ये एका जाट कुटुंबाने मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला घरी ठेवण्याऐवजी तिला शिक्षणासाठी पाठवले. सून ग्रॅज्यूएट झाली आहे. सासऱ्याने आपल्या लहान मुलाशी सुनेचे रीतसर लग्न लावण्याचा निर्णय घेतला. रूढी-परंपरांना छेद देणारा हा मोठा निर्णय त्यांनी आहे.

 

अपघातात झाला होता मोठ्या मुलाचा मृत्यू...
- जाट समाजातील राजेंद्र चौधरी ट्रान्सपोर्ट बिझनेसमन आहेत. साडे पाच वर्षांपूर्वी 17 फेब्रुवारी 2012 रोजी तीन मुलांतील सर्वात मोठ्या आयटी इंजिनिअर सुमीतचे लग्न बखतगडच्या रहिवासी गायत्रीशी लावण्यात आले होते.
- 2 जून 2014 रोजी सुमीतचा अपघातात मृत्यू झाला. वडिलांची स्वप्ने उद्ध्वस्त झालीच, सोबतच सून आणि 7 महिन्यांच्या मुलीचे भविष्यही अंधकारमय झाले.
- मुलगा गमावल्यानंतर राजेंद्र यांनी हिंमत सोडली नाही. सुनेला महिला महाविद्यालयात अॅडमिशन घेऊन दिले.
- तिथून ती ग्रॅज्युएट होऊन समाजासाठी प्रेरणा बनून पुढे आली. आता तिचे लग्न त्यांचा कनिष्ठ मुलगा हितेश करण्यात येणार आहे.

 

रूढी-परंपरा पाळत बसलो तर यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल...
- गायत्री यांचे सासरे राजेंद्र चौधरी म्हणाले की, जाट समाजात पतीच्या मृत्यूनंतर 6 महिने सुनेला पडद्याआड ठेवण्याची प्रथा आहे. विधवा सुनेला जेवणही अस्पृश्य समजून लांबूनच वाढले जाते. परंतु मी हे मला होऊ द्यायचे नव्हते. रूढी-परंपरेत गुरफटलो असतो तर सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. परंपरेच्या नावावर तिचे जीवन पणाला लावणे मला मंजूर नव्हते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...