आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या डोळ्यांदेखत रेल्वेखाली आले वडील, गाडी निघून गेल्यावर एवढे विदारक होते दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेशनवर रेल्वे निघाल्याने चढताना सुनील जैन यांचा पाय घसरला आणि रेल्वेखाली आल्याने कटला. - Divya Marathi
स्टेशनवर रेल्वे निघाल्याने चढताना सुनील जैन यांचा पाय घसरला आणि रेल्वेखाली आल्याने कटला.

इंदूर - झाबुआमध्ये स्टेशनवर स्वच्छतागृहात शौच केल्यानंतर रेल्वेत चढताना एका प्रवाशाचा पाय निसटला आणि तो थेट रेल्वेखाली आला. अपघातात त्यांचा एक पाय कटला आहे. त्यांना उपचारांसाठी नेण्यात येत होते, परंतु अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघात रविवारी बामनिया रेल्वे स्टेशनवर झाला आहे. मृताची मुलगी एका कामानिमित्त मेघनगरला जात होती.

- सूत्रांनुसार, उज्जैनपासून दाहोदला जाणाऱ्या मेमू रेल्वेत स्वार उज्जैनचे रहिवासी सुनील जैन आपली मुलगी शुभांगीसह मेघनगरला जात होते. त्यांना येथे उतरून काही कामानिमित्त झाबुआला जात होते. ते बामनिया रेल्वे स्टेशनवर शौचासाठी उतरले होते. एवढ्यात रेल्वे निघाली.
- जैन हे रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात त्यांचा पाय निसटला आणि एक पाय चाकाखाली येऊन कटला. मुलीच्या डोळ्यांदेखत वडिलांच्या पायावर रेल्वे गेली. रक्तबंबाळ वडील पटरीवर पडले. यानंतर मुलीने वडिलांना रक्तबंबाळ अवस्थेत सार्वजनिक आरोग्य केंद्र पेटलावद येथे नेले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना इंदूरला रेफर करण्यात आले. परंतु वाटेतच जैन यांना काळाने गाठले. सूत्रांनुसार, अतिरक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाला.

 

या रेल्वेत नाहीयेत शौचालय
- मेमू ट्रेन सकाळी उज्जैनहून दाहोदकडे जाते. संध्याकाळी हीच ट्रेन दाहोदहून उज्जैनकडे जाते. मोठ्या संख्येने प्रवासी यातून प्रवास करतात. प्रवाशांची संख्या अधिक असूनही ट्रेनमध्ये अजूनपर्यंत शौचालयाची व्यवस्था केलेली नव्हती. अनेक वेळा प्रवाशांनी मेमू ट्रेनमध्ये शौचालयाची मागणी केली, परंतु अजूनही कारवाई झालेली नाही. ट्रेनमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा त्रास होतो, खासकरून महिला यात्रेकरूंना.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी फोटोज व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...