आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भररस्त्यावर मॉडेलचे कपडे ओढले, तरुणीने ट्विटरवर केली तक्रार; CM म्हणाले- बेटा, तुला न्याय मिळेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तरुणीच्या ट्विटला री-ट्विट केले होते. - Divya Marathi
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तरुणीच्या ट्विटला री-ट्विट केले होते.

इंदूर - देशात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. इंदूरमधील 4 महिन्यांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच एका मॉडेलने तिच्यासोबत झालेल्या छेडछाडीची तक्रार ट्विटरवर केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराससिंह चौहान यांनी या घटनेची तातडीने दखल घेत री-ट्विट केले आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल असे मॉडेलला आश्वस्त केले आहे. ते म्हणाले, 'बेटा, तुला न्याय मिळेल.' मॉडेलने 22 एप्रिल रोजी ट्विट केले होते. त्यात म्हटले होते, की इंदूरच्या मुख्य मार्गावर दोन जणांनी माझे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हल्ल्याला प्रतिकार करताना मी खाली पडले. तरुणीने हेही सांगितले, की ज्या रस्त्यावर तिच्यासोबत ही घटना घडली त्या मार्गावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. 


शिवराज सिंह म्हणाले- मुली, तुझ्या धैर्याला मी सलाम करतो 
- शिवराज सिंहानी ट्विट केले, 'मुली, हिंमतीचे मी कौतूक करतो. मी आणि संपूर्ण प्रशासन तुझ्या मदतीसाठी बांधिल आहे. आम्ही त्यांचा शोध घेऊ आणि लवकरात लवकर तुला न्याय मिळवून देऊ. त्यांची ओळख पटवण्यासाठी तु पोलिसांची मदत कर.'

 

तरुणीने काय ट्विट केले होते... 
- तरुणीने तिच्यासोबत झालेल्या छेडछाडीचा प्रसंग ट्विटरच्या माध्यमातून समाजासमोर आणला होता. 22 एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये तरुणीने म्हटले, 'ही आजची घटना आहे. मी माझ्या अॅक्टिव्हावरुन जात होते. त्याचवेळी दोन तरुण आले, त्यांनी माझा स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात माझे गाडीवरील संतुलन बिघडले आणि मी खाली पडले. हे सर्व एका रहदारीच्या रस्त्यावर घडले. मात्र कोणीही त्या दोघांना विरोध करण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी तिथून पळ काढला. मी त्यांच्या गाडीचा नंबरही घेऊ शकले नाही. मी कधीही स्वतःला एवढे असहाय्य झालेले पाहिले नाही. माझ्या डोळ्यांदेखत काही वाईट घडत आहे आणि मी फक्त ते पाहात राहिल, मी अशी मुलगी नाही. परंतू ते पळून गेले आणि मी काहीच करु शकले नाही.'

 

'तरुण मुली अशा घटनांबद्दल बोलत नाही'
- तरुणीने पुढे लिहिले आहे, 'या घटनेनंतर माझे फ्रेंड्स आले. त्यांनी मला एका कॅफेमध्ये नेले. ते मला विचार होते की हे कसे झाले. मी लाचार नाही. मात्र त्या 30 मिनिटांच्या घटनेला मी शारीरिक, मानसिक दृष्ट्या तयार नव्हते. काही बोलण्याच्या-सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अनेक मुली तर अशा घटना त्यांच्यासोबत घडल्यानंतर त्या त्याबद्दल बोलायलाही तयार नसतात. मुलींच्या याच वागण्याचा गुंड-बदमाश फायदा उचलतात. त्यांना वाटते आम्ही काहीही केले तरी आमचे कोणी काही करु शकत नाही.'

 

'मी काय घालावे ही माझी इच्छा'
- मुलींच्या राहाण्याबद्दल, त्यांच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चा होत असते. या घटनेतही तरुणीने म्हटले आहे, की मी काय घालावे ही माझी इच्छा आहे. 'मी कोणते कपडे घातले यावरुन कोणाला मला त्रास देण्याचा अधिकार नाही. या घटनेनंतर मदतीसाठी आलेले एक अंकल म्हणाले, तु घातलेल्या स्कर्टमुळे तुझ्यासोबत असे घडले. माझ्यासोबत जे काही घडले ते एका गर्दीच्या आणि रहदारीच्या रस्त्यावर घडले.  हेच जर का एखाद्या निर्जनस्थळी घडले असते, तर याचा विचार केला तरी मला भीती वाटायला लागते.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मॉडेलने केलेले ट्विट... 

बातम्या आणखी आहेत...