आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडहूून एमबीए अर्धवट सोडून परतलेल्या पुण्याच्या तरुणाने गेस्ट हाऊसमध्ये घेतली फाशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - मूळच्या पुण्याच्या तरुणाने येथील पडावमधील साई गेस्ट हाऊसमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. सुमीत दिघे (27) असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. 10 दिवसांपासून तो गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. पोलिसांना रूममध्ये तीन सुसाइड नोट मिळाल्या आहेत. त्यापैकी दोन इंग्रजी आणि एक मराठीत आहे. वडील आणि भावांच्या नावे लिहिलेल्या एका सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले की, मी खूप चुका केल्या आहेत या चुकांसह मी जगू शकत नाही. सुसाइड नोटमध्ये दोन फोन क्रमांक लिहून त्याने लिहिले होते, या क्रमांकावर कळवा. त्याच्या नातेवाईकांचे हे नंबर होते. 


गेस्ट हाऊस स्टाफने सुमीतला रविवारी सायंकाळी पाहिले होते. सोमवारी दुपारपर्यंत तो खोलीच्या बाहेर निघाला नाही, तेव्हा स्टाफने दार ठोठावले. बराच वेळ दरवाजा उघडला नाही तेव्हा पडाव पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिस आल्यानंतर त्यांनी दार तोडले तेव्हा सुमीत फासावर लटकलेला होता. पोलिसांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. तरुणाच्या भावाने सांगितले की, सुमितला इंग्लंडला एमबीएसाठी पाठवले होते. त्याठिकाणी तो फायनल इअर एक्झाममध्ये नापास झाला होता. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये राहायचा. पुण्याला परतल्यानंतर तो 6 जूनला नोकरीच्या शोधात अहमदाबादला गेला होता. 3 जुलैपासून तो घरच्यांशी फोनवरही बोलला नव्हता. त्यानंतर पुण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही देण्यात आली होती. मृताच्या भावाने मंगळवारी ग्वाल्हेरहून त्याचा मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये पुण्याला नेला. 


सुसाइड नोटमध्ये लिहिले... 
सुमितने वडिलांनी आणि दोन भावांना मराठीमध्ये सुसाइड नोट लिहिले आहे. त्यात त्याने लिहिले आहे, मी खूप चुका केल्या आहेत. या चुकांसह मी जगू शकणार नाही. मी आधी जे काही केले तेही चूक होते. चूक यासाठी कारण मी इंग्लंडहून एमबीए पास होऊन आलो असे म्हटलो होतो. पण दोन वर्ष चांगला अभ्यास झाल्यानंतर मी फायनल इअरला फेल झालो होतो. आताही चूक करतोय, पण आता नाइलाज झाला आहे. 


10 जुलैला सुसाइड नोट, 15 जुलैला घेतली फाशी 
सुमित दिघेने सुसाइड करण्याची तयारी केली होती. पण तो संभ्रमात होता. त्याच्या खोलीतून सापडेल्या सुसाइड नोटवरून हे स्पष्ट होत आहे. सर्व सुसाइड नोटवर 10 जुलै तारीख लिहिले आहे. पण 15 जुलैच्या सायंकाळपर्यंत तो दिसला होता. गेस्ट हाऊसमध्ये तो 7 जुलैला आला होता. पण त्याने 3 जुलैपासूनच नातेवाईकांशी बोलणे बंद केले होते. 


इंग्रजीत मित्रांना लिहिले, कंपनी बंद करू नका हे माझे स्वप्न आहे 
सुमितने इंग्रजीत मित्र राहुल, अनिरुद्ध आणि गौरवची सुसाइड केल्याबद्दल माफी मागितली. त्याने लिहिले, मी आपले स्वप्न अर्धवट सोडून जात आहे. पण कंपनी बंद करू नका. हे स्वप्न आहे. पत्रात त्याने त्याचे शेअर मित्र राहुलला ट्रान्सफर करत असल्याचे लिहिले. तू जेव्हा तुझे स्वप्न पूर्ण करशील तेव्हा तुला पोलिसाच्या गणवेशात पाहायला जीवंत नसेल असे त्याने लिहिले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...