आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन चाकूने वार, उपचारासाठी चार तास भटकत राहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलीस अधीक्षक शशिकांत शुक्ला यांनी घटनेची माहिती मिळताच हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टरांची भेट घेऊन पिडित मुलीवर उपचार करण्यास सांगितले. - Divya Marathi
पोलीस अधीक्षक शशिकांत शुक्ला यांनी घटनेची माहिती मिळताच हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टरांची भेट घेऊन पिडित मुलीवर उपचार करण्यास सांगितले.

जबलपूर- मध्यरप्रदेशातील जबलपूर मध्ये शनिवार एका 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन चाकूने वार करण्याची घटना उडकीस आली आहे. या प्रकरणी एका 15 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलीवर वार केल्यानंतर आरोपी पळून गेला होता, त्यांनतर मुलीच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी मेडिकल काॅलेच्या हाॅस्पीटलमध्ये  नेले पण चार तासांपर्यंत तिला उपचार मिळाले  नाही.  सीएम हेल्पलाईन ने याची दखल घेतल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु झाले. नेमके काय आहे प्रकरण...

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिनेकी गावात राहणार पिडित मुलगी आपल्या शेजारी राहणा-या राजेश (बदलेले नाव) खेळण्यासाठी गेली होती. तिच्याबरोबर आणखी मुले होती. काही वेळानंतर सगळी मुले आपापल्या घरी गेली त्यानंतर आरोपीने मुलीली आतील खोलीत नेले व तिच्यावर जबरदस्ती केली. यावेळी मुलीने विरोध करताच त्याने पोटावर जांघेवर आणि डोक्यात चाकूने वार केले. मुलगी गंभीर जखमी झाल्याने आरोपी पळून गेला. तिच्या पालकांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला सायंकाळी 4.15 वाजता मेडिकल काॅलेजमध्ये दाखल केले पण डाॅक्टरांना मुलीवर बलात्कार झाल्याचे कळल्यावर त्यांनी उपचार न करताच तिला एलिगन हाॅस्पीटलमध्ये पाठवले. पालक तिला घेऊन सांयकाळी पाच वाजता एलिगन हाॅस्पीटलमध्ये पोहोचले. तिथे डाॅ. अर्चना ग्रोवर यांनी तिला जिल्हा हाॅस्पीटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले यानंतर पालकांसमोर पेचप्रसंग उभा राहिला. त्यांनी सीएम हेल्पलाईन वर याबाबत तक्रार केली.

 

एसपींचे देखील म्हणणे एेकले नाही. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक शशिकांत शुक्ला एलगिनम हाॅस्पीटमध्ये पोहोचले त्यांनी डाॅक्टरांना सांगितेल की प्रकरण गंभीर आहे. मुलीवर उपचार करावा लागेल पण डाॅक्टरांनी त्यांचे सुद्धा म्हणणे एेकले नाही. यानंतर एसपीनीं कलेक्टर महेशचंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधला. सीएम हेल्पलाईन आणि कलेक्टरांच्या हस्तक्षेपानंतर पिडित मुलीला रात्री 8.15 वाजता इलाजासाठी भरती करुन घेण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...