आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौलारूच्या घरात राहाणाऱ्या मुलीची हेलिकॉप्टरने पाठवणी, सर्वच म्हणाले- नशीब चमकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळविक्रेत्याच्या मुलीचा निकाह झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून ती सासरी गेली. - Divya Marathi
फळविक्रेत्याच्या मुलीचा निकाह झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून ती सासरी गेली.

रतलाम (मध्यप्रदेश) - इंदूर जवळील जावरा येथील पठानटोलीच्या चिंचोळ्या गल्यांमध्ये दोन खोल्यांच्या कौलारू घरात लहानाची मोठी झालेल्या शाहिस्ताचे नशिब असे काही चमकले की मंगळवारी हेलिकॉप्टरमधून तिची पाठवणी झाली. मुलीची पाठवणी करताना फळ विक्रेते वडील आणि शिलाई काम करुन घर चालवणाऱ्या आईसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. ते म्हणाले, आमच्या मुलीचे नशिब चांगले म्हणून तिची शाही थाटात पाठवणी होत आहे. दहावी पास शाहिस्ता म्हणाली, 'मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की माझा असा निकाह होईल आणि हेलिकॉप्टरमधून मला जाता येईल. खुदाने मला न मागता सर्वकाही दिले आहे.'

 

काय आहे प्रकरण 
- पठानटोली येथील रहिवासी वाहिदा खान यांची मुलगी शाहिस्ताचा तीन वर्षांपूर्वी राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील सुकेत येथील खनिज व्यावसायकिक आरिफ खान यांचा मुलगा हाजी आसिफ खानसोबत साखरपुडा झाला होता. 
- सोमवारी निकाहसाठी आसिफ हेलिकॉप्टरने आला आणि निकाह करुन मंगळवारी सकाळी 9 वाजता नववधू शाहिस्ताला घेऊन हेलिकॉप्टरने घेऊन गेला. 

- शाहिस्ताची आई आसिफा बी यांनी सांगितले, की तीन वर्षांपूर्वी शाहिस्ता मुगलपुरा येथे बहिणीच्या घरी गेली होती. तिथे शेजारी राहाणाऱ्या रेहाना बी यांनी (आता आजेसासू) शाहिस्ताला पाहिले आणि म्हणाल्या, एवढी सुंदर आणि सुशील मुलगी आधी माझ्या नजरेस का पडली नाही. 
- रेहाना बी यांनी राजस्थानमधील सुकेत येथे राहाणाऱ्या आपल्या जावयाला - आरिफ खान यांना फोन करुन नातवासाठी- आसिफसाठी मुलगी पाहिली असल्याचे सांगितले. त्यानंतर आसिफ खान त्यांची पत्नी फैमिदा बी मुगलपुरा येथे शाहिस्ताला पाहाण्यासाठी आले. 
- पहिल्या भेटीतच त्यांनी शाहिस्ताला पसंत केले आणि निकाह पक्का केला. तेव्हा रेहाना बी म्हणाल्या की तुमची मुलगी नशीबवान आहे. या लोकांनी 50 हून अधिक मुली पाहिल्या असतील परंतू तुमची मुलगी पहिल्या भेटीतच पसंत केली आणि लग्न करण्याचीही त्यांची इच्छा आहे. 


'आम्ही तर गरीब, तुम्ही श्रीमंत, हे नाते कसे जमेल' 
- शाहिस्ताची आई आसिफा बी यांनी सांगितले, की लग्नाची बोलणी सुरु झाल्यानंतर आम्ही मुलाचे घर पाहाण्यासाठी सुकेतला गेलो तर लक्षात आले की आसिफ आणि त्याचे वडील आरिफ खान हे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचा थाट-बाट पाहून आम्ही म्हणालो, की तुम्ही खूप श्रीमंत आहात. आम्ही फळ विक्री आणि शिलाई काम करुन घर चालवतो. आमचे कौलारूचे घर तर तुमचा हा बंगला, हे नाते कसे जमेल.
-  त्यावर आसिफ आणि त्याच्या आई-वडिलांनी सांगितले, की गरीब आणि श्रीमंत या गोष्टींचे आम्हाला काही घेणे-देणे नाही. आम्हाला शाहिस्ता पसंत आहे बाकी काही नको. आणि हे नाते जुळले.

 

पुढील स्लाइडमध्ये... छोटा भाऊ आदिलचेही जावरात लग्न, दोघे एकाच हेलिकॉप्टरमधून रवाना