आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदोर. धार जिल्ह्यातील धरमपूरीमध्ये रविवारी झालेल्या एका अपघातात चार जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. चार युवक एकाच बाईकवर बसून बाकानेर जवळील देवीच्या दर्शनासाठी जात होते त्यावेळी समोरुन आलेल्या बसची धडक बसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
ठिणगीमुळे बसमध्ये लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार धरमपूरी मधील बाकानेर बायपास वर एक प्रायव्हेट बसने बाईकला जोरदार धडक दिली. यामध्ये चारही लोकांचा मृत्यू झाला. त्यांनतर उडालेल्या ठिणगीमुळे बसमध्ये आग लागली.देवळी गावात राहणारे शुभम, कुसुमबाई, संतोष राठोड, आणि कृष्णा पाल हे एकाच बाईकवरुन माता मंदिर दर्शनासाठी जात होते. इंदोर कडे येणा-या बसने त्यांच्या बाईकला टक्कर दिल्याने चौघेही बस खाली चिरडले गेले. त्यांनतर बसमध्ये आग लागली. अॅक्सीडेंट नंतर तिथे जवळच असलेल्या लोकांनी जखमींना बस मधून बाहेर काढण्यास सुरवात केली. तसेच बसखाली दबलेली बाईक या मृतांना देखील बाहेर काढले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहचली. अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.