आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडणाऱ्या दोन मुलांचा जीवही वाचवला होता आनंदीबेन यांनी, आता बनल्या मध्य प्रदेशच्या 27व्या राज्यपाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या 27व्या राज्यपाल बनल्या आहेत. त्या ओम प्रकाश कोहली यांची जागा घेणार आहेत. याबाबत शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. आनंदीबेन गुजरातच्या मोदी सरकारमध्ये अनेक विभागांत कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींनंतर गुजरातेत सर्वात मोठ्या रिफॉर्मर म्हणून ओळखले जाते. तथापि, सप्टेंबर 2016 मध्ये रामनरेश यादव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोहली यांना मध्य प्रदेशच्या अॅडिशनल गव्हर्नरचा चार्ज सोपवण्यात आला होता.

 

केव्हा आणि कशा चर्चेत आल्या होत्या आनंदीबेन?
- आनंदीबेन यांनी 1988 मध्ये भाजपत प्रवेश केला. दुष्काळ पीडितांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनाने त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या.
- सन 1995 मध्ये शंकरसिंह वाघेला यांनी जेव्हा बंडाचे निशाण उचलले होते, तेव्हा त्या कठीण काळात त्यांनी नरेंद्र मोदींसोबत पक्षासाठी काम केले. तेव्हापासूनच त्या मोदींच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. 
- 1998 मध्ये गुजरात कॅबिनेटमध्ये आल्यानंतर त्यांनी शिक्षण, महिला आणि बाल कल्याण अशा मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. त्यांना 1987 मध्ये "वीरता पुरस्कार"नेही सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

पाण्यात उडी मारून दोन विद्यार्थ्यांचे वाचवले होते प्राण...  
- आनंदीबेन विज्ञानाच्या पदवीधर आहेत. मास्टर डिग्रीत त्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. 1967 मध्ये त्यांनी अहमदाबादच्या मोहिनीबा कन्या विद्यालयातून हायर सेकंडरी विद्यार्थ्यांना विज्ञान-गणित शिकवणे सुरू केले. यानंतर त्या याच शाळेत प्रिन्सिपलही बनल्या.
- 1987 मध्ये एका पिकनिक टूरदरम्यान दोन मुले पाण्यात पडली. तेव्हा त्यांनी पाण्यात उडी मारून त्यांचा जीव वाचवला. यासाठी गुजरात सरकारने त्यांना गैलंट्री अवॉर्ड दिला. आदर्श शिक्षिका म्हणून आनंदीबेन यांना राष्ट्रपतींच्या हस्तेही पुरस्कार मिळालेला आहे. 1997 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
- आनंदीबेन यांचे पती मफतभाई पटेलही सायकोलॉजीचे प्रोफेसर होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज व इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...