आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder Mysery: रक्ताच्या थारोळ्यात होती सासू, दुसरीकडे हात-पाय बांधून पडलेली होती सून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरकाम करणारी मुलगी घरात आल्यानंतर घटनेची माहिती कळाली. - Divya Marathi
घरकाम करणारी मुलगी घरात आल्यानंतर घटनेची माहिती कळाली.

इंदूर/बुऱ्हाणपूर - सासूचा खून आणि सुनेला मारहाण करुन घर साफ करण्याची घटना बुधवारी नेपानगर येथे घडली. सोफ्याचे कव्हर विक्रीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या गुंडांनी सासू-सुनेला बेदम मारहाण केली. यात सासूचा मृत्यू झाला. सुनेच्या तोंडात बोळा कोंबून साडीने तिचे हात-पाय बांधून गुंडांनी घर साफ केले. जवळपास अर्ध्या तासाने एक मुलगी घरात आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. बुधवारी रात्रभर आणि गुरुवारी दिवसभर डॉग स्कॉड, एफएसएलसह पोलिस पथक पुरावे गोळा करत होते. या संपूर्ण प्रकरणात सुनेवर संशय घेतला जात असल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सकाळी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी सुनेला काही वेळासाठी सोडले होते. 

 

काय आहे प्रकरण 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी नेपानगर येथील सात नंबर मोहल्ल्यात बाइकवरुन दोन तरुण सोफा कव्हर विकत होते. 
- नगर पालिकेतील लिपीक मोतीलाल साहू यांची पत्नी योगिता आणि सून दीपिका साहू यांनी कव्हर खरेदी करण्यासाठी दोन्ही तरुणांना घरात बोलावले. 
- एका युवकाने कव्हर दाखवताना दीपिकाला पिण्यासाठी पाणी मागितले. ती पाणी घेऊन आली तेव्हा पाहाते तर दोन्ही बदमाश सासूला मारहाण करत होते. गुंडांनी योगितालाही मारहाण केली. तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यातच तिचा मृत्यू झाला. 
- हे दृष्य पाहिल्यानंतर सून दीपिकाला काय करावे ते सुचेना, ती बेशुद्ध होऊन पडली होती. 
- गुंडांनी संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. घरातील दोन लाख रुपये रोख आणि सासू-सुनेच्या अंगावरील दागिने काढून घेत फरार झाले. 

 

यामुळे पोलिसांना सुनेवर संशय 
- सूनेने सांगितलेल्या या कहाणीवर पोलिसांचा विश्वास बसला नाही. कारण कॉलनीमध्ये कोणीच दोन तरुणांना सोफा कव्हर विक्री करताना पाहिले नाही. 
- दुसरी गोष्ट अशी की गुंड अर्धातास सासू-सुनेला मारहाण करत होते आणि शेजाऱ्यांना काहीच आवाज ऐकायला गेला नाही, असे कसे होऊ शकते. कारण सरकारी क्वार्टर असे आहेत की शेजारच्या घरात भांडेही पडले तर दुसऱ्या घरात आवाज होता. 
- सुनेने सांगितले की गुंडांनी सूनेच्या डोक्यावर रॉडने मारले होते, मात्र योगिताच्या डोक्यावर मारल्याची एकही खून नव्हती. दरवाजावर आतून रक्ताचे डाग आहेत. दीपिका पाणी आणण्यासाठी फक्त 10 फूट अंतरावर गेली होती याशिवाय सून दीपिकाने सांगितलेल्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या खुन बाहेरुन कोणी येऊन केला असेल हे पटण्यास पुरशा नाहीत. 

 

घरकाम करणाऱ्या मुलीने सांगितले.... 
- बुधवारी सायंकाळी 4 वाजता मी माझ्या आईसोबत सात नंबरच्या मोहल्ल्यात आले. आई राजीव पाटील यांच्या घरी गेली. मी योगिता साहू यांच्या घरी गेले. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर रक्ताचे डाग दिसले. थोडी पुढे गेले योगिता साहू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. 
- त्यांना पाहून मी आल्या पावली मागे फिरले आणि माझी आई जिकडे होती त्या राजीव पाटील यांच्या घरी गेले. आई, पाटील यांची पत्नी, मुलगा आशुतोष यांना घेऊन मी योगिता यांच्या घरी आले. घरात त्यांची सून दीपिकाचे हात-पाय बांधलेले होते. तोंडात कपड्याचा बोळा कोंबलेला होता. मग आम्ही महोल्ल्यातील लोकांना गोळा केले. पोलिसांनाही बोलावले. दीपिकाच्या तोंडातील बोळा, गोळा झालेल्या लोकांनी काढला. 

 

साहू ड्यूटीवर होते, दोन्ही मुले भोपाळला 
- मोतीलाल साहू यांना दोन मुले आहेत. दोघेही बुऱ्हाणपूर येथील आरोग्य विभागात कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपासंदर्भात दोघेही भोपाळला गेले होते. दीपिका धाकटी सून आहे, ती सासू-सासऱ्यांसोबत नेपानगर येथे राहाते. जेठ आणि जाऊ बुऱ्हाणपूर येथे राहातात. 
- घटना घडली तेव्हा घरात सासू-सून आणि दोन वर्षांचा मेहुल होता. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुनेला घेतले ताब्यात....

बातम्या आणखी आहेत...