आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Criminal Shera Killed In Police Encounter At Gwalior

एन्काऊंटर @ हायवे: 6 वर्षांची दहशत 20 मिनिटांत खलास, झाडल्या 12 गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- अंचर परिसरात दोन पोलिस कर्मचारी आणि तीन व्यापाऱ्यांची हत्या करुन दहशत पसरवणारा शेरा ऊर्फ रवी किरार याचा महाराजपुरा परिसरातील मुरैना-झाशी हायवेवर एन्काऊंटर करण्यात आला. त्याच्या डोक्यावर तीस हजार रुपयांचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले होते. शेरा त्याच्या मित्रासह शहरातून फरार होण्याच्या तयारीत होता. यावेळी पोलिसांनी त्याला घेरले. तब्बल 20 मिनिट चाललेल्या गोळीबारानंतर शेराला ठार मारण्यात आले.
पोलिसांनी शेरावर एकूण बारा गोळ्या झाडल्या. त्याचा मित्र मात्र गोळीबार करीत पळण्यात यशस्वी झाला. शेराजवळून 32 बोअरचे पिस्तुल, तीन मॅगझिन, साडे आठ हजार रुपये आणि मुरैना येथील वकील व भोपाळ येथील एक पत्रकाराचे व्हिजिटिंग कार्ड सापडले.
7 डिसेंबर रोजी झालेल्या एन्काऊंटरमध्ये शेराचे दोन सहकारी विक्की वाल्मिकी आणि सोनू नागर मारले गेले होते. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. या दरम्यान त्याने जौरा पेट्रोल पंपचे मालक गिरिराज अग्रवाल यांची हत्या केली.
7 दिवस, 80 गाव, 50 लोकांवर नजर, तेव्हा सापडला शेरा
शेराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी भिंड, मुरैना, श्योपुर, शिवपुरी, आगरा, धौलपुर, सवाई माधोपुर आणि भरतपूर येथील तब्बल 80 गावांमध्ये छापे मारले. गेल्या सात दिवसांपासून त्याने आपला मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे त्याच्याशी संबंधित 50 लोकांवर नजर ठेवण्यात आली. अखेर त्याचा पत्ता सापडला.
शेराची दहशत
शेराने 2008 मध्ये गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. पण गेल्या चार महिन्यांमध्ये त्याच्या दहशतीत वाढ झाली होती. त्याने अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्ये केली. यामुळे पोलिसांनी कायम सशस्त्र राहावे लागत होते. येथील दुकानेही लवकर बंद होऊ लागली होती. त्याच्या दहशतीचा सर्वसामान्य जिवनमानावर परिणाम होत होता. त्याचा अंचलचा डॉन व्हायचे होते. यासाठी त्याने एक टोळी तयार केली होती. त्याचे सहकारीही त्याच्या सारखेच दहशत निर्माण करणारे होते.
शिपायाच्या पिस्तुलाचा शोध
आता पोलिस शेराचा इतर चार सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी पोलिस शिपाई विकेश गुर्जर यांची हत्या केली होती. त्यांचे पिस्तुल पळवून नेले होते.
पुढील स्लाईडवर बघा, शेराची दहशत मांडणारे एन्काऊंटरचे फोटो...