आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीच्या नावाखाली महाराष्ट्राच्या तरुणीवर इंदूरमध्ये बलात्कार, जबडा तोडून फेकले दरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणीला पोलिस आणि स्थानिकांनी दरीतून बाहेर काढले. - Divya Marathi
पीडित तरुणीला पोलिस आणि स्थानिकांनी दरीतून बाहेर काढले.
मांडू/इंदूर/पुणे- नोकरी लावण्याचे आमिष देवून महाराष्ट्र्रातील एका तरुणीला तिच्या मित्राने मध्य प्रदेशात बोलवले. त्यानंतर गुंगीचे औषध देवून तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर मांडू फिरण्याचा बहाणा करत जबडा तोडून दरीत ढकलल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सुदैवाने तरुणीचा जीव वाचला आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
कसा वाचला तरुणीचा जीव
- बुधवारी सकाळी पुण्याच्या चिमननगरातील 22 वर्षीय तरुणी मांडूमधील सोनगड किल्ल्याजवळ असलेल्या दरीत जखमी अवस्थेत आढळून आली.
- इंदूरमधील तिचा मित्र शाहिद खत्रीने नोकरीचे आमिष दाखवून बोलवले होते.
- मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही तरुणी इंदूरला गेली होती. त्यानंतर तिची राहण्याची सोय एक हॉटेलमध्ये करण्यात आली.
- जेवणासोबत तिला बेशुद्धीचे औषध देण्यात आले. सकाळी उठल्यावर तिला समजले, की तिच्यावर बलात्कार झालाय.
- तिने याचा शाहिदला जाब विचारला. पण नोकरी मिळणार असल्याने गप्प बसली.
- दुसऱ्या दिवशी शाहिद तिला कंपनीच्या क्लायंटला भेटण्यासाठी घेऊन गेला.
- तिला सोनगड किल्ल्याजवळ असलेल्या दरीत नेऊन जिवघेणा हल्ला चढवला. डोक्यावर दगडाने प्रहार केला. जबडा तोडला.
- त्यानंतर शाहिदने तिला दरीत ढकलून दिले. तिच्या जिवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला.
तरुणांना दरीतून आला तिचा आवाज
- काही तरुण या दरीजवळून जात होते. त्यांना दरीतून एका तरुणीचा आवाज आला. त्यांनी 100 क्रमांकाला फोन लावला.
- त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीला 100 फुट खोल दरीतून बाहेर काढले. तिला रुग्णालयात दाखल केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, महाराष्ट्रातील तरुणीला कसे दरीत ढकलण्यात आले... अशी झाली तिची अवस्था....
बातम्या आणखी आहेत...