अलीराजपूर/इंदुर- एक मांडव. एक नवरदेव. पण नवऱ्या दोन. ही काही फिल्मी कहाणी नाही. वास्तवात असे घडले आहे. अलीराजपूर येथील बोरखड गावात असेच एक लग्न पार पडले. एका युवकाने दोन युवतींसोबत एकाच वेळी सप्तपदी घेतली. दोघींना मंगळसुत्र घातले. त्यांनीही सातजन्म साथ निभावण्याचे वचन दिले. या युवकाचे नाव रतू आहे. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही प्रेयसींचे नाव शर्मिला आहे. पहिल्या प्रेयसीपासून त्याला दोन मुलेही आहेत.
सोबत राहतात दोन्ही प्रेयसी
तीन वर्षांपूर्वी रतूचे पलासदा गावातील शर्मिलावर प्रेम जडले. भगोरिया मेलामधून तो तिला पळवून घेऊन आला. दोघे लग्न न करता सोबत राहू लागले. या दरम्यान शर्मिलाला दोन मुलेही झाली. यावेळी रतूच्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली. अंजदा गावातील शर्मिला असे तिचे नाव आहे. याची माहिती त्याने पहिली प्रेयसी शर्मिलाला दिली. तिने परवानगी दिल्यावर तो दुसऱ्या प्रेयसीला घरी घेऊन आला. दोघी एकमेकींसोबत गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यात भांडणेही होत नाहीत.
आता का केले लग्न
पहिल्या प्रेयसीसोबत तीन वर्षांपासून तर दुसऱ्या प्रेयसीसोबत गेल्या एका वर्षांपासून रतू राहत आहे. त्याने दोघींसोबतही लग्न केलेले नाही. यामुळे नाराज आदिवासी समाजाने त्याचा हुक्कापानी बंद केला होता. त्याला कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात भाग घेता येत नव्हते. त्यामुळे त्याने दोघींसोबत एकाच मांडवात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला दोघींचाही विरोध नव्हता. उलट सहमतीच मिळाली.
पुढील स्लाईडवर बघा, रतू आणि त्याच्या दोन पत्नींचे फोटो... दोघी अगदी बहिणींसारख्या राहतात...