आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला पोटगी देण्यासाठी विक्रीला काढली किडनी; किंमत 50 लाख, सौदीहून फोनदेखिल आला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदिशा (मध्य प्रदेश) - एक हजार रुपये भाडे असलेल्या घरात राहणारे 34 वर्षांचे प्रकाश अहिरराव सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे त्यांनी चक्क किडनीच विकायला काढली आहे. गेल्या 2 महिन्यांत 25 जणांनी त्यांच्याशी संपर्क केला. पण किडनीच्या मोबदल्यात त्यांना 50 लाख रुपये द्यायला कोणीही तयार नाही.  किडनी खरेदी करण्यासाठी भोपाळ, दिल्ली, मुंबई आणि सौदी अरबमधील लोकांनीही त्यांना संपर्क केला आहे. पण 15 लाखांपेक्षा जास्त द्यायला कोणीही तयार नाही. 

पोस्टर पाहून लोकांना बसला धक्का.. 
- हा प्रकार 5 सप्टेंबरला सुरू झाला. मध्यप्रदेशच्या विदिशामध्ये राहणाऱ्या प्रकाशने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 
- शहरात ठिकठिकाणी लावलेल्या पोस्टरमध्ये त्यांनी किडनी विकण्याची जाहिरात केली होती. त्या पोस्टरवर त्याचा फोटोही होता. लोकांना ते पाहून धक्काच बसला. 
- प्रकाश सांगतात की, पत्नी लक्ष्मी अहिरवारबरोबर सुरू असलेल्या कौटुंबीक वादामुळे ते पूर्णपणे उध्वस्त जाले आहेत. 
- कोर्टाच्या आदेशानुसार घटस्फोटानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना पत्नीला पोटगी म्हणून दर महिन्याला 2200 रुपये आणि एकरकमी 30 हजार रुपये तो देऊ शकत नाही. त्यामुळेच किडनी विकायची असल्याचे तो म्हणाला. 

सौदीहून आला कॉल 
- प्लंबर म्हणून काम करणाऱ्या प्रकाश अहिरवार यांनी सांगितले की, 7 सप्टेंबरला सौदी अरबच्या एका व्यक्तीचा त्यांना कॉल आला होता. 
- त्याला मित्रासाठी 15 लाख रुपयांत किडनी हवी होती. पण मी त्याला 50 लाखांची मागणी केली. त्यानंतर त्याने परत संपर्क केला नाही. 
- 8 सप्टेंबरला हरियाणाच्या रोहतक शहरातूनही गजेंद्रसिंह नावाच्या व्यक्तीबरोबर चर्चा झाली होती. पण 50 लाख ऐकूण त्याचीही हिम्मत झाली नाही. 
- त्याशिवाय भोपाळ, दिल्ली आणि मुंबईच्या अनेक एनजीओंनीही त्याला संपर्क केला आणि किडनी विकण्याऐवजी कोर्टात खटला लढवण्याचा सल्ला दिला जात आहेत. 
- प्रकाश अहिरवार यांनी सांगितले की, 2002 मध्ये लक्ष्मी अहिरवारबरोबर त्यांचे लग्न झाले होते. त्याला 12 आणि 6 वर्षांची दोन मुले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...