इंदुर (मध्य प्रदेश)- वडीलांच्या ऑफिसमध्ये रिव्हॉल्व्हरशी खेळताना 11 वर्षीय मिष्ठी यादवचा हकनाक जीव गेला. यावेळी खोलीत तिची काकू आणि लहान बहिण होती. वडील ऑफिसच्या समोर एका व्यक्तीसोबत बोलत होते. अचानक गोळी चालल्याचा आवाज झाला. आत आले तर मिष्ठी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, मिष्ठीला दुसऱ्या व्यक्तीने गोळी मारली, असे प्राथमिक पोलिस तपासणीत स्पष्ट झाले आहे.
इंदुरचे पोलिस आयुक्त ओ. पी. त्रिपाठी यांनी सांगितले, की ही घटना काल रात्री सुमारे 8 च्या सुमारास घडली. योगेंद्र यादव यांचे वाईन शॉप आहे. त्याच्या मागेच त्यांचे ऑफिस आहे. रात्रीच्या सुमारास ते गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या मिष्ठीला घेऊन रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मिष्ठीच्या छातीला गोळी लागली होती. ती अगदी आरपार निघाली होती.
योगेंद्र यांनी सांगितले, की मी ऑफिसच्या बाहेर क्लार्कसोबत बोलत होतो. मिष्ठी, दीड वर्षांची तिची छोटी बहिण शुद्धी ऑफिसमध्ये खेळत होत्या. यावेळी काकू नीतू याही ऑफिसमध्ये होत्या. नीतू यांनी सांगितले आहे, की त्या शुद्धीला घेऊन बाथरुमला गेल्या होत्या. मिष्ठी ऑफिसमध्ये ऐकटी होती. यावेळी गोळीचा आवाज आला. मी धावत गेली तर मिष्ठी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
दुसऱ्याच व्यक्तीने चालवली गोळी
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. मिष्ठीने जर गोळी चालवली असती तर तिच्या हातावर गन पावडर सापडली असती. पण तिच्या हातावर ही पावडर सापडलेली नाही. शिवाय गोळीची दिशा, उडालेले रक्त आणि मिष्ठी बसली असलेले ठिकाण यात बरीच तफावत आढळून येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनास्थळाचे आणखी फोटो... अशी उडाली गोळी...