आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पप्पा लवकर या, सासू अन् पती मला ठार मारतील; अंगभर होत्या मारहाणीच्या खुणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - सिहोर जिल्ह्याच्या बुधनी परिसरात हुंड्याच्या लोभापायी पतीने रात्री उशिरा पत्नीला बेदम मारहाण केली. कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून पत्नीने स्वत:ला दुसऱ्या खोलीत बंद केले आणि तेथून आपल्या वडिलांना फोन करून माहिती दिली. पीडिता म्हणाली की, जर ते लवकरच आले नाही, तर सासू आणि पती मिळून मला मारून टाकतील. बुधनी येथे राहणारी भावना चौहानने सासू आणि पतीविरुद्ध मारहाण तसेच हुंड्यासाठी छळ हे आरोप करून एफआयआर नोंदवली आहे. पती आणि सासूने केलेल्या मारहाणीच्या खुणा पूर्ण देहावर स्पष्ट दिसत होत्या.

 

अचानक पतीसह खोलीत शिरली सासू
- भावना म्हणाली की, शुक्रवारी रात्री उशिरा अचानक माझी सासू मायावती आणि पती मनीष माझ्या खोलीत आले. मी माझ्या दोन वर्षांच्या मुलासह झोपलेले होते. यादरम्यान दोघांनी कोणतेही कारण नसताना मला मारहाण सुरू केली. दोघांनी बेलण्याने आणि काठीने मला मारहाण केली. यामुळे माझी पाठ आणि हातावर अनेक जखमा झाल्या आहेत.

 

स्वत:ला केले खोलीत बंद, वडिलांना केला फोन
भावना म्हणाली की,  मारहाणीदरम्यान कशीबशी मी स्वत:चा जीव वाचवून दुसऱ्या खोलीत पळाले. दुसऱ्या खोलीत बंद करून मी लगेच माझ्या वडिलांना रघुवीर सिंह यांना कॉल केला आणि लवकर या म्हणाले. जर मी वडिलांना कॉल केला नसता तर त्यांनी आतापर्यंत माझा जीव घेतला असता. फोनवर माझा आवाज ऐकताच वडील बुधनी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि मला व माझ्या मुलाला घरी घेऊन आले.

 

4 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
- पीडिता भावना म्हणाली, नोव्हेंबर 2012 मध्ये मनीष चौहानशी माझे लग्न झाले होते. एका वर्षापर्यंत सर्वकाही सुरळीत राहिले, पण यानंतर सासू आणि पतीने हुंड्यासाठी छळ करणे सुरू केले. सासू मला सारखी माहेरातून फ्रिज आणि वॉशिंग मशीन आणायला सांगायची. मी नकार दिल्यावर पती आणि सासू मला मारहाण करायचे. सासूने भडकवल्यामुळे पतीने मला अनेकदा घटस्फोट देण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. मी अनेक दिवसांपासून शारीरिक व मानसिक तणाव सहन करत राहिले, परंतु आता सहनशक्ती संपली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...