आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Young Girl Given Three Times Capital Punishment In MP

या युवतीला सुनावली आहे तिहेरी फाशी, देशपांडे कुटुंबीयांची केली होती हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- या युवतीचे वय केवळ 27 वर्ष आहे. ती दिसायला देखणी आहे. पण तिने तिघांची क्रूर हत्या केली आहे. नेहा वर्मा नावाची ही युवती आणि तिच्या दोन सहकाऱ्यांना इंदूरच्या सेशन कोर्टाने तीन वेळा फाशी देण्याचा निर्णय दिला आहे. एखाद्या युवतीला तीन वेळा फाशी सुनावली जाण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. निर्णय देताना विशेष अपर सत्र न्यायाधीश डी. एन. मिश्र यांनी म्हटले होते, की तीन पिढ्यांची हत्या करणाऱ्याला मृत्युदंडाशिवाय इतर कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही. त्यानंतर हायकोर्टानेसुद्धा ही शिक्षा कायम ठेवली होती. सध्या नेहा इंदूरच्या जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण यासंदर्भातील अंतिम निर्णय यायचा आहे.
अशी केली होती देशपांडे कुटुंबीयांची हत्या
निरंजन देशपांडे श्रीनगरमधील एका बॅंकेत अधिकारी होते. 19 जून 2011 रोजी त्यांची पत्नी मेघा (45), मुलगी अश्लेषा (23) आणि सासू रोहणी फडके (70) यांची हत्या करण्यात आली होती. दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येने मध्य प्रदेश हादरला होता. काही दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना पकडले. यातील नेहा वर्मा प्रमुख आरोपी आहे. तिने प्रियकर राहुल ऊर्फ गोविंदा चौधरी (24) आणि त्याचा मित्र मनोज अटोदे (32) यांच्या मदतीने या हत्या घडवून आणल्या होत्या.
लग्नासाठी गोळा करायचे होते पैसे
पोलिस चौकशीत नेहाने सांगितले आहे, की मी आणि रोहित प्रेमात होतो. आम्हाला लग्न करायचे होते. पण जवळ पैसे नव्हते. त्यामुळे दोघांनी मनोज नावाच्या व्यक्तीसोबत मिळून कट रचला. या घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी एका शॉपिंग मॉलमध्ये नेहाची भेट मेघा यांच्याशी झाली होती. तेव्हा नेहाला समजले होते, की मेघाचा नवरा बॅंकेत मोठा अधिकारी आहे. शिवाय त्यांच्या घरी तिघींशिवाय इतर कुणी राहत नाही.
नेहाने ही बाब रोहितला सांगितली. लुटीचा कट रचला. त्यासाठी एक दिवस रेकी केली. मार्केटिंगचा फॉर्म भरण्यासाठी नेहा मेघा यांच्या घरी गेली. जरा वेळाने फोन करुन रोहित आणि मनोजला बोलवले. घरात प्रवेश केल्याबरोबर दोघांनी मेघाला गोळ्या घातल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून अश्लेषा आणि रोहिणी धावत आल्या. रोहित आणि मनोजने त्यांना भोसकले. जरा वेळात तिघी मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर तिघांनी घरातील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो...