आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Youth Beaten Up By Girl For Giving Miss Call In MP

PHOTOS: मिस कॉल देणाऱ्याला गोड बोलून बोलवले पोलिस ठाण्यात, नंतर चपलेने मारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंड (ग्वाल्हेर)- एक तरुण एका तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करायचा. अश्लिल बोलायचा. सुरवातीला तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरुण काही समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे फोन सुरुच होते. त्यानंतर मुलीने यावर भारी शक्कल लढवली. गोड बोलून त्याला पोलिस ठाण्यासमोर भेटायला बोलवले. तरुण खुष झाला. तो ठाण्यासमोर आला. त्यानंतर तरुणीने दुर्गावतार धारण केला. हातात चप्पल घेऊन त्याला चांगले झोडपून काढले.
नरेंद्र जटाव नावाचा तरुण एका तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करुन त्रास देत होता. याची तक्रार तिने पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरिक्षक सुनील खेमरिया यांनी प्रत्यक्ष या केसमध्ये लक्ष घातले. त्यांनी सायबर सेलकडून कॉल डिटेल्स काढले. यावेळी या तरुणीने तब्बल पाच दिवस मोबाईल बंद ठेवला. त्यानंतर पुन्हा नरेंद्रचा फोन आला. तो तिला त्रास देऊ लागला. तरुणीने खेमरिया यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तरुणीचा ही शक्कल सुचवली.
तरुणी दोन दिवस नरेंद्रसोबत गोड बोलली. त्यानंतर त्याला भेटायला बोलवले. यावेळी खेमरिया साध्या ड्रेसमध्ये टीमसह उपस्थित होते. नरेंद्र आल्यावर खेमरिया यांनी नरेंद्रला अटक केली. यावेळी तरुणी रागाने संतप्त झाली. तिला नरेंद्रला चांगलीच अद्दल घडवायची होती. तिने पायातली चप्पल काढली. पोलिसांसमोर त्याला चांगलेच मारले. अरुण अहिरवार नावाच्या तरुणाने नरेंद्रला या तरुणीचा मोबाईल नंबर दिला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या तरुणीने मोबाईलवर फोन करणाऱ्या नरेंद्रला कसे मारले....