भोपाळ/सागर (मध्य प्रदेश)- माजी मिस इंडिया आणि आम आदमी पक्षाची नेता गुल पनाग सध्या चाइम्स एव्हिएशन अॅकेडमीतून प्रायव्हेट पायलटचे ट्रेनिंग घेत आहे. तिने चंदिगड मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिला बाईकचे प्रचंड वेड आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना ती कायम बाईक्सवर दिसायची.
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलली गुल पनाग
1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीत कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजप तर धार्मिकतेला आधारित प्रचार करुन सत्तेत आला आहे. हिंदुत्व तर त्यांचा खुला अजेंडा आहे. दोन्ही पक्षांनी सहिष्णूतेच्या मुद्द्यावर बोलायलाच नको.
लालू-केजरीवाल यांची मिठी
कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव अनेकदा जादुकी झप्पी घेताना दिसायचे. तेव्हा असा वाद होत नव्हता. आता अरविंद यांनी लालूंना मिठी मारली तर त्याचा चुकिची प्रचार केला जात आहे.
राजकारण फुलटाईम जॉब नाही, सर्व्हिस
राजकारण हे उत्पन्नाचे माध्यम नाही. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक येतो तेव्हा सरकार आपल्याला वेतन आणि भत्ते देते. म्हणजेच राजकारण सर्व्हिस आहे. मला जेव्हा वेळ मिळतो मी माझ्या पार्टीला देते. जनतेची सेवा करते.
पुढील स्लाईडवर बघा, माजी मिस इंडिया गुल पनागचे इतर फोटो.....