आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: आईनेच घेतला चिमुकलीच्या जीवाचा घोट; कॅरिबॅगेत घालून नाल्यात फेकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फेसबुकवरून घेण्यात आलेला आरोहीचा तिच्या वडिलांसोबतचा फोटो)

जबलपूर -
सिव्हिल क्षेत्रातील सुपारीचे व्यापारी सुशील आहुजा यांची आठ दिवसांपूर्वी हरवलेली 6 वर्षांच्या आरोहीचा मृतदेह मिळाला आहे. या चिमुकलीला मारणारी कोणी दूसरी नसून तिच्या आईनेच तिच्या जीवाचा घोट घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे संगोपन व्यवस्थितपणे होत नसल्याने आपण तीला मारल्याचे तिच्या आईने सांगितले आहे.
चौकशी दरम्यान आरोहीची आई रितू हिने सांगितल्याप्रमाणे, रामपूर नायगावमधील एका नाल्यात आरोहीचे अवशेष आणि कपडे मिळाले आहेत. या हायप्रोफाईल प्रकरणाचा उलगडा डीआयजी मकरंद देऊस्कर यांनी दिलेल्या एका प्रेसनोटमधून झाला. आरोही हारवल्यापासूनच रितूचे बोलणे संशयास्पद वाटत होते. त्यामुळेच हे गंभीर प्रकरण उलगडले. घटनेनंतर दहाव्या दिवशी पोलिसांनी रितूला एकट्यात भेटून तिची चौकशी केली. जवळपास एक तास चाललेल्या या चौकशीत रितूने सर्व हकीकत सांगितली.
चौकशीत रितूने सांगितले की, मी आरोहीला एका कॅरिबॅगमध्ये टाकून रामपूरला नेले, तिथे मी माझ्या जीवंत मुलीला नाल्यात फेकले. रितूने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी जवळपास पंधराफुटाच्या परिघात तपास केला आणि तेथे मुलीचे अवशेष आणि कपडे मिळाले. त्यानंतर रितूविरोधात खुनाचा खटला नोंदवण्यात आला. रितूची अजून एका मुलीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी दूध पिल्यानंतर संशयास्पद झाला होता.

कॅमेर्‍यातून पकडले सत्य
कटंगा भागातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये या निर्दयी आईचा कारनामा कैद झाला होता. जेव्हा रितू घटनेच्या दिवशी पोलिसांनी रितूला तिच्या दिवसभराच्या कामाविषयी विचारले तेव्हा सत्य बाहेर आले. कटंगा भागातील एका दूकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये रितू हातात कॅरिबॅग घेऊन जाताना तर दिसली, मात्र येताना तिच्या हातात कॅरीबॅग नव्हती. यावरूनच पोलिसांचा संशय पक्का झाला.
पुढील स्लाईडमध्ये पाहा फोटो....