आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरब्याचा भोपाळी अंदाज : डीजेच्या तालावर रात्रभर थिरकली तरुणाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - अभिव्यक्ती गरबा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. युवक-युवतींसह वयाने थोडे ज्येष्ठ असलेल्यांनीही रविवारी उशिरा रात्रीपर्यंत गरबा केला. यावेळी मैदानावर प्रथमच कर्व्ह एलइडी स्क्रिन लावण्यात आला होता. त्यामुळे गरबा पाहाणाऱ्यांच्याही डोळ्याचे पारणे फिटले.
तरुणाईने डीजे नितीन आणि संदीपच्या तालावर जोरदार डान्स आणि गरबा केला. अभिव्यक्तीच्या तिसऱ्या दिवसाचा बेस्ट ड्रेस ग्रुपचा पुरस्कार नवरात्री ग्रुपला मिळाला. बेस्ट ड्रेस मेलचा अवॉर्ड अश्विन दुबे आणि सुमित सोनगरा यांना विभागून मिळाला. तर बेस्ट ड्रेस फिमेल नानू विश्वास आणि नीना जेम्स यांनी पटकवला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डोळ्याचे पारणे फेडणारे गरबाचे फोटो