आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे MPचा गरबा : भक्तीरसात न्हाली अभिव्यक्ती, मध्यरात्रीपर्यंत थिरकली तरुणाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - राजधानीत गुरुवारपासून दसरा मैदानावर अभिव्यक्ती गरबा सुरु झाला असला तरी त्याची तालिम कित्येक दिवस आधीपासून सुरु होती. गरबामध्ये युवक-युवती जोश आणि जल्लोषात थिरकले. महोत्सवाची सुरुवात महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर भक्तीगीतांवर तरुणांनी ताल धरला. याशिवाय मध्यप्रदेशात इंदूर आणि ग्वाल्हेरमध्ये मध्यरात्रीपर्यंत तरुणाईने ठेका धरला होता.
अबालवृद्धांनी गरब्यात रंगत आणली. एक महिन्यापासून सराव करत असलेल्या तरुणांच्या पायांमध्ये लय होती. गुरुवारी महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच सर्वांमध्ये उत्सहा भरुन राहिला होता. 19 ऑक्टोबर पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. गरब्यासह येथे विविध व्यंजनांचे लज्जतदार स्टॉल्सही आहेत. अनेकांनी गरबा झाल्यानंतर येथे पोटपूजा केली. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने गरब्यासाठी तरुण-तरुणी आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अभिव्यक्ती गरब्याची धूम