इंदुर (मध्य प्रदेश)- येथील सांवेर रोडवर भीषण अपघात झाला. उजैन येथून इंदुरला जात असलेल्या रिट्ज कारचा पुढचा टायर फुटला. यामुळे ही कार रस्ता दुभाजकाला धडकून इंदुर येथून उजैनला जात असलेल्या मारुती झेन कारवर जोरदार आदळली. या अपघातात झेन कारचे दोन तुकडे झाले. धडक देणारी रिट्ज कार उलटून शेतात जाऊन पडली.
या अपघातात झेन कारचा चालक निश्चय जैन आणि एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
या अपघाताचे भीषण फोटो बघा पुढील स्लाईडवर...