आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरखा घालून आलेल्या गुंडांचा कॉलेजला निघालेल्या शिक्षिकेवर अॅसिड हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शनिवारी सकाळी बाइकवर आलेल्या एका तरुणाने शिक्षिकेवर अॅसिड हल्ला केला आहे. शिक्षिकेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षिका लहान बहिणीसोबत कॉलेजला जात होत्या.

- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरेरा कॉलनी येथे लहान बहिणीसोबत राहाणाऱ्या पूजा (नाव बदलले आहे) शनिवारी सकाळी कॉलेजला निघाल्या होत्या.

- त्याचवेळी मागून आलेल्या दोन बाइक स्वारांनी त्यांच्यावर अॅसिड फेकले.
- हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. ते कोण होते हे अद्याप कळू शकलेले नाही.
- शिक्षिकेने मदतीसाठी आरडाओरड केली तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते.
कोण आहे शिक्षिका
- शिक्षिका सिवनी येथील रहिवासी आहेत त्या भोपाळमधील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षिका आहेत.
- भोपाळमध्ये त्या लहान बहिणीसह भाड्याच्या घरात राहातात.
- डॉक्टरांनी सांगितले, की शिक्षिकेचा चेहरा सोडून शरीर मोठ्या प्रमाणात भाजले आहे.
बातम्या आणखी आहेत...