आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी समुहाच्या कंपनीत दुर्घटना, पाच कामगारांचा गुदमरुन मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - मध्यप्रदेशातील निमच येथील अदानी समुहाच्या विल्मार सोया प्रकल्पात गुरुवारी वेस्ट मटेरियल टँकची सफाई करताना पाच कर्मचार्‍यांचा गुदमरुन मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी दुपारी 2.45 वाजता घडली. वेस्ट मटेरियलने भरलेल्या टँकची सफाई करण्यासाठी दोन कर्मचारी गेले होते. काही वेळानंतर दुर्गंधीने त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांना बाहेर काढण्यासाठी दोन सुरक्षा रक्षकांसह तीन जण खाली उतरले. ते त्यांना वाचवण्याआधीच त्यांनाही तसाच त्रास होऊ लागला. ते कोणाला आवाजही देऊ शकले नाही. जेव्हा इतर कर्मचार्‍यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते धावत तिकडे गेले आणि त्यांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. तिथे सर्वांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे विल्मार सोया प्रकल्पात भीती आणि शोक असे वातावरण निर्माण झाले.
मृतांमध्ये युवराज सिंह(33), रायसिंह (30), दीपक(28), राजेंद्र सिंह(24) आणि रवि सोनी (24) अशी आहेत. विल्मार सोया प्रकल्प प्रशासनाने या घटनेबद्दल मौन बाळगले आहे. तर, पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेसंबंधीत छायाचित्रे