आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमी अतिरेक्यांचे तालिबानशी संबंध, मध्य प्रदेश एटीएसचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/सोलापूर - मध्य प्रदेशात मंगळवारी अटक करण्यात आलेला सिमीचा हस्तक अबू फैझल आणि इतर दोघांचे पाकिस्तानी तालिबानशी लागेबांधे असल्याचा गौप्यस्फोट राज्य एटीएसने बुधवारी केला. तहरीक-ए-तालिबान ही अतिरेकी संघटना पाकमध्ये वायव्येकडे सक्रिय आहे.
मध्य प्रदेशच्या खांडवा तुरुंगातून 1 ऑक्टोबर रोजी अबू फैझलसह सिमीचे सहा अतिरेकी पळून गेले होते. मुख्य आरोपी फैझल, इरफान नागोरी, खालिद अहमद यांना मंगळवारी बारवानी जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून सोलापुरातून मोहंमद सादिक अब्दुल वहाब लुंझे व ओमर अब्दुल हाफिज दंडोती यांना मंगळवारीच उचलण्यात आले. या दोघांना बुधवारी इंदूरला नेण्यात आले आहे.
नेत्यांच्या हत्येचा कट : फैझल व त्याचे सहकारी देशातील काही महत्त्वाच्या व्यक्ती, नेत्यांवर हल्ल्यांचा कट रचत होते, असे चौकशीतून निष्पन्न झाल्याचे एटीएस प्रमुख पोलिस महानिरीक्षक संजीव सामी यांनी बुधवारी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील सभेत स्फोट प्रकरणातील आरोपींच्याही संपर्कात हे अतिरेकी होते.
छत्तीसगडमध्ये एक अटकेत : छत्तीसगड एटीएसने बुधवारी रायपूरमधून धीरज साओ या सिमी व इंडियन मुदाहिदीनच्या हस्तकाला अटक केली. दोन्ही संघटनांना पैसे पुरवत असल्याची कबुली त्याने दिली आहे.
सोलापूर कनेक्शन असे
मध्य प्रदेशात अटक झालेला खालिद मुछाले मूळ सोलापूरचा आहे. इंदुरात त्याला एका गुन्ह्यात अटक झाली होती. तेथे तुरुंगात त्याची फैझलशी ओळख झाली. जानेवारीत खालिद पॅरोलवर सुटला. पुढे ऑक्टोबरमध्ये फैझल खांडवा तुरुंगातून पळाला. त्यानंतर खालिदने सोलापुरातील लुंझे आणि दंडोती यांच्या साथीने फैझलला ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी मदत केली होती. औरंगाबाद व मध्य प्रदेश एटीएसने मंगळवारी सोलापुरात केलेल्या कारवाईत खालिदच्या सोलापुरातील घरातून पिस्तूल, 100वर डिटोनेटर्स आणि 70 जिलेटीन जप्त केले होते.