आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्‍नानंतर 5 वर्षे कित्‍येक रात्री झोपू शकले नाही हे कपल, अशी आहे दोघांची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरती शुक्‍ला पांडेय आणि त्‍यांचे पती अंबुज शुक्‍ला. - Divya Marathi
आरती शुक्‍ला पांडेय आणि त्‍यांचे पती अंबुज शुक्‍ला.
भोपाळ- 13 ऑक्‍टोबररोजी मध्‍यप्रदेशमध्‍ये अतिरिक्‍त जिल्‍हा न्‍यायाधीश परीक्षेचे‍ निकाल जाहीर झाले. या परीक्षेत आरती शुक्‍ला यांनी तिसरा क्रमांक तर त्‍यांचे पती अंबुज शुक्‍ला यांनी 15वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल आरती शुक्‍ला पांडेय यांनी सांगितले की, 'या परीक्षेसाठी आम्‍ही दोघांनीही खूप मेहनत घेतली. रोज 15-15 तास अभ्‍यास केला. कित्‍येक रात्री आम्‍ही झोपलोही नाही.' त्‍यांच्‍या या कठोर मेहनतीचे फळ म्‍हणजे लग्‍नाच्‍या 5 वर्षांनंतर दोघांचीही अतिरिक्‍त जिल्‍हा न्‍यायाधीश म्‍हणून निवड झाली आहे. 

अशी केली तयारी 
- आरती यांनी सांगितले की, घरात पूर्वीपासूनच परीक्षेच्‍या तयारीसाठी योग्‍य असे वातावरण होते. 
- ज्‍युडिशिअरीमध्‍ये आवड असल्‍याने दोघांनाही आपण न्‍यायाधीश बनू शकतो, असे वाटत होते.  
- लग्‍नानंतर मी पतीलाही या परीक्षेला बसण्‍यासाठी प्रेरीत केले. 
- अभ्‍यास लक्षात रहावा म्‍हणून आम्‍ही दोघेही आळीपाळीने मोबाईलमध्‍ये त्‍याची ऑडीओ रेकॉर्डींग करत होतो. 
- घर ते ऑफीसदरम्‍यानच्‍या प्रवासात कारमध्‍ये गाणे लावण्‍याऐवजी आम्‍ही ते रेकॉर्डींग लावत असू. 
- आरती पांडेय या सिहोर जिल्‍ह्यात डिस्‍ट्रीक्‍ट लिगल अँड ऑफीसर आहेत. 

यशाचे संपूर्ण श्रेय मुलाला 
- आरती यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय त्‍यांचा 4 वर्षांचा मुलगा अस्तित्‍व याला दिला आहे. 
- आरती यांनी सांगितले की, 'आम्‍ही रोज 15-15 तास अभ्‍यास करायचो व कित्‍येक रात्री झोपायचोही नाही. अशात अनेकदा वाटायचे की, हे आपल्‍याला जमणार नाही. अभ्‍यास सोडून देण्‍याचा विचारही मनात यायचा.' 
- तेव्‍हा अस्तित्‍व त्‍यांना हरिवंशराय बच्‍चन यांची कविता ऐकवून त्‍यांना प्रेरीत करण्‍याचा प्रयत्‍न करायचा. कविता ऐकवल्‍यावर तो आपल्‍या आई-वडीलांना म्‍हणायचा की, जज बनायचे असेल तर अभ्‍यास करा. 

झाला पेपर...चला आता माझ्याशी बोला 
- सर्व परीक्षेदरम्‍यान अस्तित्‍व किती शहाण्‍यासारखा वागला, याच किस्‍साही आरती यांनी सांगितला आहे. 
- त्‍या सांगतात, 'पुर्ण दिवस आम्‍ही अभ्‍यास करायचो. तेव्‍हा अस्तित्‍व गुपचाप खोलीत डोकवायचा आणि स्‍माईल देऊन परत जायचा. 
- ज्‍या दिवशी आमचा पेपर झाला. तेव्‍हाचे त्‍याचे शब्‍द मी कधीच विसरु शकत नाही, असे आरती यांनी सांगितले. 
- परीक्षा देऊन घरी आल्‍यावर अस्तित्‍व त्‍यांना म्‍हणाला होता की, 'झाला पेपर...चला आता माझ्याशी बोला.' 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज... 

 
बातम्या आणखी आहेत...