आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The Child Birth Mother Ran With Boy Friend

मातृत्‍वाला कलंक: चिमुकलीला जन्‍म देताच जन्मदाती प्रियकरासोबत पसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉस्‍पीटलमध्‍ये मुलीला सोडून माता प्रियकरासोबत पसार झाली)
भिंड (मध्‍यप्रदेश) आई कुणा म्‍हणू आईस हाक मारी, स्‍वामी तिन्‍ही जगाचा आई विना भिकारी....! आ म्‍हणजे आत्‍मा अन् ई म्‍हणजे ईश्‍वर. साक्षात आई म्‍हणजे ईश्‍वराचे दुसरे रुप. हा मातृत्‍वाचा सन्‍मान. परंतु मातृत्‍वालाच कलंक लावणारी अशी घटना घडली. एका आईने आपल्‍या पाच दिवसांच्‍या मुलीला हॉस्‍पीटलमध्‍ये सोडून प्रियकरासोबत पलायन केले आहे.
जिल्‍हा रुग्‍णालयात रीना राजावत सात ऑक्‍टोबर रोजी प्रसुतीसाठी आली होती. मुलीला जन्‍म देऊन पाच दिवसही होत नाहीत तोच रीना जावईचा भाऊ रामु चव्‍हाण सोबत पळून गेल्‍याची तक्रार पती अरुण राजावत याने पोलिस चौकीमध्‍ये केली आहे.
जीवे मारण्‍याची धमकी
रामू चव्‍हाण यापूर्वीही रीनाला घेऊन पळून गेला होता. रीनाला मी परत नांदण्‍यासाठी आणलयानंतर रामूने मला जीवे मारण्‍याची धमकी दिली असल्‍याचेही अरुण राजावत याने सांगितले.
लवकरच कारवाई करु
जिल्‍हा हॉस्‍पीटलमध्‍ये नवजात बालकाला सोडून गेलेल्‍या रानीवर शक्‍य ति‍तक्‍या लवरक कारवाई करणार असल्याचे सिटी कोतवाली पोलिसांनी सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मातृत्‍वाला कलंक लावणा-या अशाच काही घटना...