आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळच्या वाचकांची मदत मराठवाड्यासाठी रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: १५ टन धान्याने भरलेला ट्रक दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी झेंडा दाखवून रवाना केला.
भोपाळ |ग्वाल्हेर/पानिपत - अन्नदान अभियानाअंतर्गत दुष्काळग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेले अन्नधान्य बुधवारी येथून मराठवाड्याकडे रवाना करण्यात आले. १५ टन धान्याने भरलेला ट्रक दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी झेंडा दाखवून रवाना केला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चालवण्यात आलेल्या अभियानात येथील वाचकांनी भरभरून अन्नदान केले आहे.

ग्वाल्हेर येथून ९ टन धान्य रवाना
येथेही अन्नदान मोहिमेस वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. स्वयंसेवी संस्था, शाळा - महाविद्यालये तसेच व्यक्तिगत पातळीवरही लोकांनी जीवनावश्यक वस्तू दान केल्या. त्यातून जमा झालेले नऊ टन धान्य ट्रकद्वारे मराठवाड्यासाठी पाठवण्यात आले. जयेंद्रगंज येथील भास्कर कार्यालयातून धान्याचा ट्रक रवाना करण्यात आला. या वेळी मराठी संस्थांची प्रतिनिधी अपर्णा पाटील, ग्रीन गार्डन समितीचे राम पांडे, एम. के. शर्मा, जनरल मॅनेजर विशाल मिश्रा, फायनान्स हेड कुशल गुप्ता, सहायक संपादक रमेश राजपूत, एचआर प्रमुख नितीन चतुर्वेदी व इतर सहकारी उपस्थित होते.

पानिपत येथून २० टन धान्य संकलीत
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून येथेही अन्नदान मोहीम राबवण्यात आली. त्यात पानिपत येथे याअंतर्गत ९ टन धान्य जमा झाले, तर अंबाला व झज्जर येथूनही धान्य जमा झाले. अशी एकत्रित २० टन धान्यसामग्री दुर्बल विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून ट्रकद्वारे महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आली. या वेळी प्राचार्य कमलेश, शिक्षिका रजनी व विद्यार्थी उपस्थित होते.