आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुचा ट्रक उलटला अन् प्रत्येक गावक-याच्‍या हाती दिसली \'बॉटल\', पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्‍ट्रीय महामार्ग- 92 वर बरोही पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत इंग्‍लीश वाईन (इम्‍पीरियल ब्‍लू्) घेऊन जाणारा ट्रक नियंत्रण सुटल्‍यामुळे उलटला. पोलिस पोहोचण्‍याअगोदर गावकरी आणि इतर वाहनातील प्रवाशांनी वाईनचे बॉक्‍स पळविले. पोलिस तातडीने हजर झाले. त्‍यांनी सौम्‍य लाठीचार्ज करुन लुटारूंना पळवून लावले.
ग्वाल्‍हेरच्‍या रायरू डिसलरीतून हा ट्रक पटनाकडे जात होता. ट्रकमध्‍ये 2400 इम्‍पीरियल ब्‍लूचे बॉक्‍स होते. या दारूची किंमत बाजारपेठेत दोन कोटींपेक्षाही जास्‍त असल्‍याचे सांगितले जाते. पिडौरा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्‍यामुळे ट्रक रस्‍त्‍याच्‍या बाजूला उलटला. या ट्रकमध्‍ये मद्य असल्‍याचे लक्षात येताच गावक-यांची एकच झुंबड उडाली. वा-यासारखी बातमी गावभर पसरली. गावतील अनेक लोक ट्रकच्‍या दिशेने पळू लागले. पोलिस पोहोचेपर्यंत गावक-यांनी आणि प्रवाशांनी अर्ध्‍यापेक्षा जास्‍त माल लुटला. या अपघातामध्‍ये जीवीत हानी झाली नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा कशा प्रकारे लुटली दारू...