आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किन्नरांचे सौंदर्य पाहाण्यासाठी उडाली झुंबड, येथे बाहेरच्यांना प्रवेश आहे बॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - देशभरातून आलेल्या किन्नर येथील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. येथील राय प्रगती मैदानावर किन्नरांचे 10 दिवसीय अखिल भारतीय किन्नर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी देशभरातून 2000 किन्नर आपल्या गुरुंसह दाखल झाले आहेत. त्यांना पाहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे, मात्र 'बाहेर'च्या लोकांना येथे परवानगी नसल्यामुळे लोक रस्त्यावर उभे राहूनच नजारा पाहात आहेत. 
 
कशासाठी केले संमेलनाचे आयोजन 
- गुरु बॉबी बाईने सांगितले, की किन्नर समाजातील वृद्धांचे निधन, मुलांना आशीर्वाद आणि समाजाच्या शुभचिंतनासाठी संमेलनाचे आयोजन केले जाते. 
- संमेलनात स्टॉल लावण्यासाठी जम्मू कश्मीर, जालंधर, लुधियाना, अमृतसर, जयपुर, अजमेर, फिरोजाबाद, लखनऊ, रायपुर, जबलपुर येथून दुकानदार आले आहेत. त्यांनी सांगितले, की आम्ही फक्त किन्नर संमेलनातच दुकान लावतो. संमेलन केव्हा आणि कुठे आहे याची माहिती किन्नरांकडूनच मिळते.
- बारामुला येथून आलेले नासिर अमायन म्हणाले, मी 15 वर्षांपासून किन्नर संमेलनात शॉल, सूटचे दुकान लावत असतो. 
 
सहा महिन्यांपासून सुरु होती तयारी 
- लुधियाना येथून आलेले सतवीरसिंह म्हणाले, 18 वर्षांपासून मी संमेलनात सामान विक्री करीत आहे. कधी-कधी किन्नरांच्या रोषाचाही सामना करावा लागतो. मात्र संमेलन संपल्यानंतर ते सर्वांना खुश करुन जातात. 
- या संमेलनाची तयारी सहा महिन्यापासून सुरु होती. 
- गुरु बॉबी बाईने सांगितले, की संमेलनाची रितसर परवानगी घेतलेली आहे. पोलिस आयुक्त, जिल्हा प्रशासन यांनी परवानगी दिली आहे. येथे सर्वांची योग्य व्यवस्था देखिल आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, देशभरातून आलेले किन्नरांना पाहाण्यासाठी झुंबड... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)