आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: विषारी सापाचा शेतक-याला दंश, सापाचा तडफडून मृत्‍यू, शेतकरी सुखरूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- विषारी सापाचे नाव काढले तरी आपल्‍या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, मध्‍यप्रदेशातील एका घटनेनंतर आश्‍चर्य व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. घडले असे की, विषारी साप एका व्‍यक्‍तीला चावला, त्‍यानंतर व्‍यक्‍ती सुखरूप आहे. मात्र, साप मरण पावला आहे. शिवाय मध्‍यप्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्‍ये मागील काही दिवसांमध्‍ये अशा विचित्र घटना समोर आल्‍या आहेत. अशा आहेत विचित्र घटना..
प्रकरण पहिले..
टीमकगढ जिल्‍ह्यातील जतारा पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत असलेल्‍या भडरा गावात काही लोक शेतात होते. दरम्‍यान बुधवारी दुपारी 3 वाजता नारायण सिंह या 54 वर्षीय व्‍यक्‍तीच्‍या हाताला चारा उचलताना साप चावला. त्‍याच्‍या काही वेळानंतर घटनास्‍थळावर तडफून सापाचा मृत्‍यू झाला. नातेवाईकांनी नारायण यांना तत्‍काळ उपचारासाठी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले. काही लोकांनी मृत सापही हॉस्‍पिटलमध्‍ये सोबत आणला होता.
दूसरे प्रकरण..
दुसरे प्रकरण हे बैतूल जिल्‍ह्यातील आहे. येथे 11 जूनला एका नागिनीने सुखराम यादव (70) यांना चावा घेतला होता. घटनेनंतर गावातील काही लोकांनी नागिनीला ताब्‍यात घेऊन दोन दिवस गावातील मंदिरात ठेवले. वृद्धावर मलाजपूरच्‍या बाबांच्‍या समाधी स्थळावर उपचार करण्‍यात आले. यातून वृद्ध सुखरुप बचावला. नंतर तीन दिवसानंतर लोकांनी नागिनीला ठार केले. याबाबत काहींनी सांगितले की, सर्पदंश झालेला व्‍यक्‍ती जिवंत राहण्‍यासाठी साप जीवंत असणे महत्‍त्वाचे आहे. साप मरण पावला तर, त्‍या व्‍यक्‍तीच्‍या प्राणासही धोका असतो, असे लोक सांगतात.
तिसरे प्रकरण..
तिसरे प्रकरण हे विदिशा जिल्‍ह्यातील ग्यारसपूर येथील आहे. ही घटना मे महिन्‍यात झाली होती. येथे एका व्‍यक्‍तीला विषारी सापाने दंश केला होता. त्‍यानंतर त्‍या व्‍यक्‍तीने सापाला पकडले व हॉस्‍पिटलमध्‍ये नेले. तेथे त्‍याचा उपचार करण्‍यात आला. पीर खान (65) असे या व्‍यक्‍तीचे नाव आहे. उपचारादरम्‍यान दरम्‍यान सापाला बंद डब्यात ठेवून ते फिरत होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या तिनही घटनांशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...