आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा, रेड्यांच्या टकरीत पायाखाली तुडवले गेले प्रेक्षक, उडाली पळापळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा (मध्य प्रदेश)- नागचून परिसरातील विटभट्टीजवळ रेड्यांची टक्कर आयोजित करण्यात आली होती. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. रेड्यांची टक्कर सुरू झाल्यावर उडालेल्या पळापळीत काही जखमीही झाल्याचे वृत्त आहे. परंतु, तरीही नागरिकांचा उत्साह काही कमी झाला नाही.
रविवारी दुपारच्या सुमारास दोन रेड्यांची टक्कर लावण्यात आली. त्यानंतर काही काळाने रेडे लोकांच्या दिशेने धावू लागले. त्यामुळे उपस्थितांमध्ये पळापळ उडाली. कुणी झाडावर चढले तर कुणी रेड्यांच्या पायाखाली आले. रेड्यांनी धडक दिल्याने काही जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा रेड्यांच्या टकरीची छायाचित्रे